काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपासाठी दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरासह चैत्यभूमीवर येत असल्याने तसेच रविवारी होणाऱ्या जाहीर सभेच्या स्वागतासाठी मैदान परिसरात बॅनर व फलक लावण्यात आले आहेत. शिवाजी महाराज मैदानातील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या परिसरातही हे बॅनल लावून तो संपूर्ण परिसर झाकून टाकण्यात आला आहे. याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांची राष्ट्रीय स्मारके असून संयुक्त महाराष्ट्र स्मृति दालनाचा परिसरही बॅनर व फलकांनी झाकोळून गेला आहे. त्यामुळे आजवर कधीही बाळासाहेबांचे स्मृतिस्थळ तसेच राष्ट्रीय स्मारकांचा परिसर बॅनर व फलकांनी झाकला गेला नव्हता, तो भाग राहुल गांधींच्या जाहिरातबाजीने झाकला गेल्याने सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. (Rahul Gandhi)
छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर हा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील चैत्यभूमीवर होणार असून यानिमित्त रविवारी याचा समारोप करणारी जाहीर सभा आयोजित केल्याने यासाठी मोठ्या प्रमाणात फलक व बॅनर लावून पक्षाच्या वतीने जाहिरातबाजी करण्यात आली आहे. राहुल गांधी यांचे स्वागत करणारे फलक संपूर्ण मुंबईभर आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात लावण्यात आले आहे, मात्र हे फलक लावतानाच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळचे तसेच राष्ट्रीय स्मारकांचे पावित्र्यही जपण्यात आले नाही. (Rahul Gandhi)
(हेही वाचा – Veer Savarkar : उद्धव ठाकरे राहुल गांधींना वीर सावरकरांसमोर नतमस्तक व्हायला लावून माफी मागायला लावणार का? ; भाजपाचे आव्हान)
काँग्रेसच्या हवशा, गवशा आणि नवशांनी मिळेल त्या जागेत बॅनर आणि फलक लावलेले असून बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाच्या परिसरातील रेलिंगवरच हे फलक लावले असून सावरकर मार्गावरून स्मृतिस्थळाचे दर्शनही होत नाही. सावरकर मार्गावरून स्मृतिस्थळाचा परिसर बॅनरमुळे बंदिस्त झाला आहे असून संपूर्ण भागच झाकला गेला आहे. आजवर कोणत्याही सभांमध्ये स्मृतिस्थळाच्या परिसरात बॅनर व फलक लावले जात नाही. उलट सभांवेळी स्मृतिस्थळाच्या जागेला पांढऱ्या कपड्यांनी झाकले जाते; परंतु राहुल गांधी यांच्यासाठी काँग्रेसने बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला झाकल्यानंतरही उबाठा शिवसैनिकांकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया उमटलेली नाही. उलट राहुल गांधी व प्रियांका गांधी यांचे स्वागत शिवसेना भवनासमोर मोठ्या जल्लोषात करण्यात आले. (Rahul Gandhi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community