गोवरबाधितांची संख्या वाढली; तीन केंद्रात रुग्णांना मिळणार उपचार

मुंबईतील पाच विभागांपाठोपाठ जी उत्तरमध्ये नवे ३ या विभागात गोवरचे तीन नवे रुग्ण सापडले आहेत. यंदाच्या वर्षांत आता गोवरच्या रुग्णांची संख्या १२६ तर सप्टेंबर महिन्यापासून १४ नोव्हेंबरपर्यंत गोवरच्या रुग्णांची संख्या ९९ वर पोहोचली आहे. मुंबईत आता एफ-उत्तर, जी-उत्तर, एच-पूर्व, पी-उत्तर, एल, एम-पूर्व आणि एम-पश्चिम या विभागांत गोवरचे रुग्ण अद्यापपर्यंत आढळले आहेत.  वाढत्या गोवरची साथ लक्षात घेता पालिकेने चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात रुग्णांना उपचार देण्यास सुरुवात केली आहे. येत्या दिवसांत गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय तसेच अर्बन हेल्थ सेंटरमध्येही गोवरबाधित रुग्णांना उपचार दिले जातील.

( हेही वाचा: तुम्हाला मधुमेहाचे निदान झाले आहे का? स्थूलपणा कमी करायला शस्त्रक्रिया करण्यासाठी विमा कंपन्यांची टाळाटाळ )

गेल्या आठवड्यात मुंबईत गोवरची साथ आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्य विभागाची तसेच राज्य आरोग्य विभागाच्या टीमने मुंबईतील गोवरची साथ आढळून आलेल्या परिसराला भेट दिली. सोमवारी क्षेत्रीय भेट पूर्ण झाल्यानंतर गोवरच्या साथीसंदर्भात मुंबईतील आरोग्य यंत्रणेबाबतचा अहवाल दिल्लीतील केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य विभागाला तसेच राज्य सरकारला दिला जाईल. पालिका आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत यंदाच्या वर्षांत तब्बल ९०८ रुग्णांमध्ये ताप आणि गोवरची बाधा होण्याचे संकेत देणारे पूरळ दिसून आलेत. त्यापैकी १२६ रुग्णांना गोवरची बाधा दिसून आली. सोमवारनंतर केंद्रीय तसेच राज्य पथकाने राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना तसेच पालिकेच्या पश्चिम उपनगरे अतिरिक्त आयुक्तांना गोवरच्या साथीसंदर्भात बैठक घेत सूचना केल्या. केंद्रीय पथक सोमवारी तर राज्य आरोग्य विभागाचे पथकानेही क्षेत्रीय भेटी पूर्ण झाल्यानंतर मुंबई सोडली.

केंद्रीय पथकाच्या सूचना 

  •  गोवरची साथ आलेल्या विभागात दररोज ताप व पुरळच्या नवीन रुग्णांचा शोध घेणे
  • लक्षणे आढळलेल्या रुग्णांचा दुस-या दिवशी पाठपुरावा करणे
  • अतिरिक्त लसीकरणाच्या सत्राचे आयोजन करणे
  • रुग्ण दाखल करण्याची सुविधा वाढवणे
  • आरोग्य सेविकांना गोवर आजाराच्या गंभीर लक्षणाबाबत अवगत करणे
  • खासगी डॉक्टरांना गोवर व लसीकरणाविषयी अवगत करणे
  • लसीकरणाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करणे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here