Organ Donation : नागपूरमध्ये पोलिसाचे मरणोत्तर अवयवदान; पत्नीने घेतला पुढाकार

अवयवदानातून तीन जणांना मिळाले नवे आयुष्य

210
Organ Donation : नागपूरमध्ये पोलिसाचे मरणोत्तर अवयवदान; पत्नीने घेतला पुढाकार
Organ Donation : नागपूरमध्ये पोलिसाचे मरणोत्तर अवयवदान; पत्नीने घेतला पुढाकार

नागपूर येथील पोलिस हवालदार पती पत्नीने अवयवदानाचा नवा आदर्श समजसमोर मांडला. पतीचा कामावरून घरी परतताना दुचाकीवरून अपघाती मृत्यू झाल्यानंतर पत्नीने आपल्या पतीच्या अवयवांचे मरणोत्तर अवयवदान केले. या अवयवदानातून तीन जणांना नवे आयुष्य मिळाले. जिवंतपणी समाजसेवा करणाऱ्या पती पत्नीने केलेल्या अवयवदानाचा नागपूर वासीयांसमोर आदर्श घालून दिल्याने त्यांचे समाजातील सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

अपघाताची घटना – 

किशोर तिजारे नागपूर येथील पोलिस मुख्यालयात पोलिस हवालदार म्हणून काम पाहतात. ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी आपले कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर तिजारे आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. मात्र, त्याच वेळी त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिजारे यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासाअंती डॉक्टरांनी तिजारे यांना मेंदू मृत घोषित केले. या अवस्थेत रुग्णाचे अवयव हळूहळू बंद होत त्याचा मृत्यू होतो. दरम्यानच्या काळात रुग्णाच्या शरीरातून अवयवदान करता येते. पती मेंदू मृत झाल्याचे समजताच पत्नी सपना तिजारे यांनी त्यांचे अवयवदान करण्याचे ठरवले.

किशोर तिजारे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या शरीरातून दोन मूत्रपिंडे आणि दोन डोळे दान करण्यात आले. दोन मूत्रपिंडापैकी एक मूत्रपिंड रुग्णालयात नव्या मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला शस्त्रक्रियेच्या माध्यमातून दिले गेले. डोळे नेत्रदान पेढीत देण्यात आले. हे नागपूर भागातील १८ वे अवयवदान होते. सध्या राज्यात कोविडनंतर अवयवदान बऱ्याच प्रमाणात बाधित झाले आहे. मुंबईत यंदाच्या वर्षांत २८ वेळा अवयवदान झाले आहे. त्यामुळे अवयव कार्यास समाजातील सर्व स्तरातून सहभाग नोंदवला जावा, असे आवाहन अवयवदान चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केले.

अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय? –

मृत व्यक्तीच्या किंवा जिवंत व्यक्तीच्या फुफ्फुसाचा किंवा मूत्रपिंडाचा काही भाग शस्रक्रियेद्वार विलग करुन गरजू रुग्णाच्या शरीरात देणे म्हणजे अवयव प्रत्यारोपण होय. ही प्रमाणित वैद्यकीय उपचार पद्धती आहे.

कोणत्या अवयवांचे दान करता येते? –
  • मृत रुग्णाचे हृदय बंद पडले असेल तर केवळ डोळे आणि त्वचेचे दान करता येते. हृदय बंद पडल्याने इतर अवयवांना रक्त पुरवठा बंद झालेला असतो. इतर सर्व अवयव प्रत्यारोपणासाठी बाद ठरलेले असतात.
  • उपचारादरम्यान किंवा अपघातानंतर रुग्ण कित्येकदा मेंदू मृत अवस्थेत जातो. या अवस्थेत रुग्णाची जगण्याची शक्यता नसते. परंतु हृदय प्रक्रिया सुरु असते. मेंदू मृत रुग्णाकडून अनेक अवयवांचे दान करता येते.
  • मूत्रपिंडे, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंडे, हृदय, आतडी, नेत्र, त्वचा, हृदयाची झडप आणि कानाचे ड्रम यांचे दान करता येते.

(हेही वाचा – Kishori pednekar : किशोरी पेडणेकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स)

अवयवदान कायदेशीर प्रक्रिया – 
  • देशात मानवी अवयव प्रतिरोपण कायदा १९९४ नुसार मेंदू मृत डॉक्टरांनी विशिष्ट चाचण्यांनंतर घोषित करणे आणि अवयवदान या दोघांनाही कायदेशीर मान्यता आहे.
  • मेंदू मृत मृत्यू हा प्रत्यारोपणासाठी मान्यता असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या तपासाअंती घोषित केला जातो.
  • मानवी अवयवांच्या व्यापाराला या कायद्यात कायदेशीर मान्यता नाही. तसेच या कार्यात कोणताही आर्थिक व्यवहार करता येत नाही.
  • दात्याच्या कुटुंबीयांना अवयव मिळालेल्या रुग्णाचे नाव व पत्ता दिला जात नाही. कायद्यानुसार यासाठी परवानगी दिली जात नाही. रुग्णालादेखील दात्याची तसेच त्याच्या कुटुंबीयांची माहिती दिली जात नाही.
अवयवदानाची प्रक्रिया – 
  • जिवंतपणीच रुग्णाने अवयवदानाचा निर्णय घेतला असेल तर रुग्णाने कुटुंबीयांना याबाबतची कल्पना देणे आवश्यक ठरते. कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय रुग्णाकडून मृत्यूपश्चात अवयवदान करता येत नाही.
  • अवयवादासाठी प्रत्येक राज्यातील रुग्णालये तसेच रुग्णालयाशी निगडीत अवयव प्रत्यारोपण समिती कार्यरत असतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.