Bangladeshi Infiltration रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न आवश्यक; स्वप्नील सावरकर यांनी मांडली दाहक वस्तुस्थिती

Bangladeshi Infiltration : फेरीवाले, बांधकाम मजूर यांच्यातील बांगलादेशींना ओळखणे आणि त्यांना परत पाठवणे, हे मोठे आव्हान आहे, असे स्वप्नील सावरकर म्हणाले.

56

मुंबईत बांगलादेशी घुसखोर आहेत, त्यांना पकडून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे. बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध (Bangladeshi Infiltration) कारवाई करतांना लक्षात येते की, यंत्रणेमध्ये लूपहोल्स आहेत. आपली व्यवस्था धर्मनिरपेक्षतावादी आहे. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांचे फावते. ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांच्या अभ्यासानुसार ७ कोटी बांगलादेशी भारतात आहेत. आपल्या कराच्या पैशातून आपण त्यांना पोसत आहोत. बांगलादेशी मजूर जास्त आढळतात. फेरीवाले, बांधकाम मजूर यांच्यातील बांगलादेशींना ओळखणे आणि त्यांना परत पाठवणे, हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदुस्थान पोस्टचे संपादक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सहकार्यवाह स्वप्नील सावरकर (Swapnil Savarkar) यांनी केले.

(हेही वाचा – Beed Crime : बीडमध्ये 50 गोण्या अफू जप्त ; 3 गुंठ्यात अवैध अफूचे पीक)

ते वीर सावरकरांच्या (Veer Savarkar) आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने मुलुंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान महायज्ञाच्या (Blood Donation) उद्घाटनप्रसंगी बोलत होते. २ मार्च या दिवशी मुलुंड (Mulund) येथील चित्पावन ब्राह्मण संघ हॉल येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक समिती आणि अन्य सामाजिक संस्था यांच्या वतीने हे रक्तदान आयोजित करण्यात आले. स्वप्नील सावरकर यांच्या हस्ते वीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक समितीचे कार्यकारी प्रमुख उदयकुमार गोखले, समितीच्या सदस्या अस्मिता गोखले, सावरकर स्टडी सेंटरचे विनायक काळे आदी उपस्थित होते.

या वेळी बांगलादेशी घुसखोरांविरूद्धच्या लढ्यातील आव्हाने सांगतांना स्वप्नील सावरकर म्हणाले, “मालाड, मालवणी अंबूजवाडी कांदळवन हटवून जमीन तयार केली गेली. इमारती वसवल्या गेल्या. टाटाकडून वीज दिली गेली. बीएमसीची पाणी कनेक्शन दिली गेली. पहिले चोरीची होती. नंतर दंड आकारून नियमित करण्यात आले. हे सर्व बातम्यांच्या अनुशंगाने उघड केले. तेव्हा माझ्या मागे काही माणसे यायला लागली. मला कोण काय माहिती देते, याकडे लक्ष ठेवू लागले. आपण बांगलादेशींच्या विरोधात काम करतांना असे अनुभव येऊ शकतात. परंतु निर्भयपणे काम करत रहाणे गरजेचे आहे.” (Bangladeshi Infiltration)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.