संविधानातील आदर्श आणि तत्त्वे अधोरेखित करण्यासह त्यांच्याप्रती वचनबद्धता पुन्हा सुनिश्चित करण्याबरोबरच संविधानाच्या संस्थापकांच्या योगदानाचा सन्मान आणि स्मरण करण्याच्या उद्देशाने, भारतीय संविधानाचा स्वीकार केल्याच्या स्मृती जागवण्यासाठी, दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा केला जातो. (Constitution Day)
संविधान दिवस साजरा करताना, संसदीय कामकाज मंत्रालयाने सर्व नागरिकांना संविधान प्रश्नमंजुषा आणि उद्देशिकेच्या ऑनलाइन वाचनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यात अधिकाधिक लोक भागिदारी सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालयाने दोन वेब पोर्टल्स कार्यान्वित केली आहेत. (Constitution Day)
(हेही वाचा – Mumbai-Pune Megablock : विकेंडला मुंबई-पुणे प्रवास करताय, मग जाणून घ्या काय आहे रेल्वेचे बदलेले वेळापत्रक)
२२ अधिकृत भाषा आणि इंग्रजीमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे ऑनलाइन वाचन:
ऑनलाइन प्रश्नमंजुषा (“भारत: लोकशाहीची जननी”) :
https://constitutionquiz.nic.in/
पोर्टल्स प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत आणि यात कोणालाही सहभागी होऊन सहभागाचे प्रमाणपत्र प्राप्त करता येईल. प्राप्त प्रमाणपत्रे #SamvidhanDiwas हॅशटॅग वापरून समाजमाध्यम मंचावर पोस्ट करता येतील. (Constitution Day)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community