सेवा विवेक सामाजिक संस्थेमार्फत बोट गावातील बांबूपासून हस्तकलेत प्राविण्य मिळवलेल्या आदिवासी महिलांना “संविधान साक्षरता” मोहिमे अंतर्गत संविधानाचे महत्व व फायदे याचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला सेवा विवेकचे मार्गदर्शक, जेष्ठ विचारवंत, लेखक आणि राष्ट्र सेवा संघाचे जेष्ठ कार्यकर्ते रमेश पतंगे प्रमुख पाहुणे होते. सोबत राजकुमारी गुप्ता, समाजसेविका आणि प्रगती भोईर , प्रशिक्षण व विकास अधिकारी सेवा विवेक उपस्थित होत्या.
महिलांना संविधानचे पुस्तक त्यांनी नक्की वाचावे
रमेश पतंगे यांनी बोट गावातील उपस्थित महिलांना संविधान साक्षरता मोहिमे अंतर्गत संविधानाचे महत्व व फायदे याचे मार्गदर्शन याचे धडे दिले. यावेळी महिलांना संविधानातून मिळालेल्या हक्काचे महत्व त्यांना पटवून दिले. संविधानाने आपल्याला काय दिले तर आम्हला राजकीय अधिकार दिले. मतदान करण्याचा अधिकार काय असतो आपल्यावर राज्य कोणी करायचे हे आपण आपल्या मतदानातून ठरवू शकतो. स्री-पुरुष लिंगभेद, कन्या जन्म महिलांना संविधानाने खूप संरक्षण दिले आहे. रस्त्यावर फिरताना कोणी छेड काढली किंवा त्रास दिला तर त्याला संविधानात दंड देण्याची तरतूद आहे अशी संविधानातील संरक्षणात्मक व विविध माहिती महिलांना दिली. संविधानाने मुक्तपणे जगण्याचा, मुक्तपणे बोलण्याचा अधिकार दिला आहे तसेच एकत्रित येऊन बसण्याचा आणि विचार करण्याचा अधिकार दिला आहे, आपण चार पैसे आपल्या मनाप्रमाणे खर्च करू शकतो हे सर्व स्वतंत्र आपल्याला संविधानाने दिले आहे हे सर्व सांगताना रमेश पतंगे यांनी महिलांना संविधानचे पुस्तक त्यांनी नक्की वाचावे अशी सूचना केली.
(हेही वाचा भारतीय सैन्यही चीनमध्ये घुसखोरी करते; भालचंद्र नेमाडे यांचे बेताल वक्तव्य)
पर्यावरण पूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा
या मार्गदर्शन शिबिरात महिलांचा उत्सुर्फ प्रतिसाद होता. रमेश पतंगे यांचे मार्गदर्शन मनपूर्वक लक्ष देऊन ऐकूण घेतले तसेच पतंगे याच्या प्रश्नांना उत्तर देत होत्या, त्यांचा मनातील प्रश्न त्या शिबिरात मांडत होत्या. कार्यशाळा संपल्यावर महिलांनी संविधानाचे महत्व संविधानातील अधिकार संविधानातील हक्क ह्याची माहिती मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. सेवा विवेक सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरुजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा त्यांना सन्मान जनक रोजगार प्राप्त होवा यातून सेवा विवेक ने पुढाकार घेतला आहे. अशा महिलांना मोफत बांबू हस्तकलचे प्रशिक्षण दिले जाते. पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडोहून अधिक महिलांनी प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण घेतल्यावर महिलांनी बांबूपासून उत्तम दर्जेदार पर्यावरण पूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा मिळवला आहे.
३६ बांबू हस्तकलेच्या आकर्षक वस्तू तयार
उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे चांगली मागणी आहे. ह्या वर्षी महिलांनी बनवलेल्या राखी व कंदीलांना विदेशातही मागणी होती. तसेच वर्षभर महिला इतर वस्तू मोठ्या प्रमाणात तयार करतात यामध्ये बांबूपासून विविध प्रकारचे पेन होल्डर, मोबाईल होल्डर, पात्राधर, फिंगर जॉइंट ट्रे तयार आदी सारख्या ३६ बांबू हस्तकलेच्या आकर्षक वस्तू तयार करतात. या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्हातील आदिवासी महिलांचा रोजगार निर्मितीवर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून फावल्या वेळेत बांबू काम करून रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे. चांगला रोजगार प्राप्त होत असल्यामुळे महिला घरची जबाबदारी स्वीकारून मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देत आहे. गेल्या वर्षी सेवा विवेकच्या कार्याचा माजी राष्ट्रपती व महामहीम राज्यपाल यांनी कौतुक केले आहे. माजी राष्ट्रपतीद्वारे हस्तकला प्रशिक्षित आदिवासी महिलांचा सत्कार करण्यात आला. आज संस्थेतील अनेक प्रशिक्षण घेतलेल्या महिला ह्या संस्थेच्या प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत तसेच नवीन महिलांना त्या प्रशिक्षण देत आहेत. यामुळेच आदिवासी समाजातील महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे.
Join Our WhatsApp Community