नवीन पनवेल येथील देवद आणि विचुंबे या गावांमध्ये लोकसंख्या बरीच वाढली आहे. त्यामुळे साहजिकच वाहनांचीही संख्या वाढलेली आहे. म्हणून या दोन्ही गावांमधून पनवेल रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी गाढी नदीवरून पूल बांधण्याचे CIDCO ने प्लॅन केले. मात्र हा पूल अर्धवट बांधून तसाच ठेवला आहे. CIDCO च्या या भोंगळ कारभारामुळे येथील विकासकामाला खीळ बसली आहे.
काय आहे प्रकरण!
या ठिकाणी विचुंबे आणि देवद या दोन्ही गावांसाठी वाहनांकरता गाढी नदीवरून एकच जुना पूल आहे. आता या दोन्ही गावांत बऱ्याच इमारती उभ्या राहिल्या आहेत. लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे साहजिकच या जुन्या पुलावर कायम वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. आता तर हा पूल धोकादायक बनला असल्याने या पुलावरून अवजड वाहनांना प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही गावांतील रहिवाशांची गैरसोय वाढत आहे.
दुसरीकडे देवद गावातील रहिवाशी चक्क पाण्याच्या पाइपलाईनच्या देखभालीसाठी बांधलेल्या छोट्या पुलावरून ये-जा करत असतात. विशेष म्हणजे या पुलावरून वर्दळ करण्यात नियमानुसार परवानगी नाही, तरीही नाईलाजास्तव रहिवासी बाजारहाट करण्यासाठी, मुलांना शाळेत सोडण्यासाठी, नोकरीसाठी रेल्वे स्थानकाकडे जाण्याकरता या पुलाचा वापर करतात. या पुलावरूनच रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहनेही ये-जा करतात. हे धोकादायक असूनही रहिवासी नाईलाजाने जीव धोक्यात घालून या पुलाचा वापर करतात.
(हेही वाचा Konkan Railway: खोळंबलेल्या एसटीमुळे कोकण रेल्वेचा चाकरमान्यांना मदतीचा हात; आणखी एका विशेष रेल्वेची घोषणा)
नवीन पुलाची मागणी
वाढती लोकसंख्या लक्षात घेता या दोन्ही गावांसाठी नवीन पूल बांधण्याची मागणी होत होती. त्यानुसार CIDCO ने दोन पूल बांधण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याप्रमाणे पूल बांधण्याचे काम सुरूही केले. त्यानुसार गाढी नदीवर पूल बांधलाही, मात्र तो आता अर्धवटच राहिला आहे. हा पूल गावाच्या बाजूला जोडला आहे, परंतु रेल्वे स्थानकाच्या दिशेने जोडालाच नाही. त्यामुळे हा पूल पूर्णच होऊ शकता नाही.
११ कोटी रुपयांचा पूल
CIDCO ने ११ कोटी रुपये खर्चून हा पूल बांधला आहे. तरीही या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे.
या पूलाला आताच तडे गेले आहेत, त्यामुळे या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचेही झाल्याचे दिसून येत आहे
लोकांची जीव घेणी कसरत
आता रहिवाशांनी अर्धवट पुलावरून ये – जा सुरु केली आहे. यासाठी रेल्वे स्थानकाच्या दिशेने अर्धवट राहिलेल्या पुलावर दोरी बांधण्यात आली आहे. त्या दोरीच्या साहाय्याने १५ फूट उंच चढून रहिवाशी या पुलावर ये-जा करत आहेत. ही जीवघेणी कसरत आता रहिवाशी करत आहेत. यात काही दुर्घटना झाली तर CIDCO याची जबाबदारी घेणार का, असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community