IT Parkच्या नावाखाली इमारतीचे बांधकाम; प्रत्येक वर्षी सादर करावी लागणार जागेच्या वापरासंदर्भातील कागदपत्रे

यापुढे प्रत्येक वर्षी अशाप्रकारच्या बांधकामांमधील गाळेधारकांना वापरासंदर्भातील कागदपत्रे महापालिकेला सादर करणे बंधनकारक राहणार असून, ज्या गाळेधारकांकडून जागेचा गैरवापर होत असल्याचे दिसून आल्यास त्यांना मालमत्ता कराच्या रकमेच्या तुलनेत मागील सहा वर्षांची रक्कम दंडासहित वसूल केली जाणार आहे.

692
IT Parkच्या नावाखाली इमारतीचे बांधकाम; प्रत्येक वर्षी सादर करावी लागणार जागेच्या वापरासंदर्भातील कागदपत्रे
IT Parkच्या नावाखाली इमारतीचे बांधकाम; प्रत्येक वर्षी सादर करावी लागणार जागेच्या वापरासंदर्भातील कागदपत्रे

आयटी पार्कच्या (IT Park) नावाखाली बांधकाम करून जागेचा गैरवापर करणाऱ्यांचा शोध घेऊन आता महापालिकेने (BMC) त्यांच्यावर दंडात्मक कारवाई (Penal action) करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी आता प्रत्येक वर्षी आयटी पार्कच्या नावाखाली बांधकाम केलेल्या कमर्शियल इमारतींमधील गाळेधारकांना जागेच्या वापरासंदर्भातील कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने (Municipal Administration) दिले आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक वर्षी अशाप्रकारच्या बांधकामांमधील गाळेधारकांना वापरासंदर्भातील कागदपत्रे महापालिकेला सादर करणे बंधनकारक राहणार असून ज्या गाळेधारकांकडून जागेचा गैरवापर होत असल्याचे दिसून आल्यास त्यांना मालमत्ता कराच्या रकमेच्या तुलनेत मागील सहा वर्षांची रक्कम दंडासहित वसूल केली जाणार आहे. (IT Park)

अतिरिक्त एफएसआयचा (FSI) लाभ घेण्यासाठी काही वर्षांपूर्वी आयटी पार्कच्या (IT Park) नावाखाली बांधकामे मुंबईमध्ये झाली आहेत. परंतु या आयटी पार्कच्या (IT Park) नावाखाली बांधकामे झाल्यानंतर प्रत्यक्षात या कमर्शियल गाळ्यांमधील गाळेधारकांकडून आयटी (IT Park) संदर्भातील व्यावसाय किंवा कार्यालय न थाटलेली नसून प्रत्यक्षात या गाळ्यांमध्ये आयटी (IT Park) व्यतिरिक्त इतर व्यावसाय थाटले आहेत. त्यामुळे एकप्रकारे हा जागेचा गैरवापर केला जात आहे. दादरमधील चार ते पाच इमारतींमधील ४५० गाळेधारकांना केवळ त्यामध्ये गारमेंट्सचे धंदे थाटल्याने नोटीस बजावली आहे. दादरमध्ये या व्यतिरिक्त रुबी मिल कंपाऊंडमधील बांधकामांमध्ये आयटी (IT Park) व्यतिरिक्त इतर वापराची कार्यालयेही थाटलेली आहे. त्यामुळे दादर (Dadar) आणि माहिमधील अशाप्रकारच्या सर्व आयटीच्या (IT Park) नावाखाली बांधकाम केलेल्या आणि प्रत्यक्षात जागेचा केला जाणारा वापर यासंदर्भात शोध मोहिम राबवली जात आहे. (IT Park)

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : नरेंद्र मोदी हेच पुन्हा निवडून येणार)

दोनशे टक्के दंड वसूल केला जाणार

आयटीच्या (IT Park) नावाखाली केल्या जाणाऱ्या बांधकामांमध्ये मालमत्ता करात सवलत मिळते आणि त्या आधारे ही सवलत हे गाळेधारक घेत आहेत. परिणामी महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. यासंदर्भात महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी काही महिन्यांपूर्वीच करनिर्धारण व संकलन विभागाला निर्देश देत आयटीच्या नावाखाली बांधकाम झालेल्या सर्व इमारतींना नियम १५५ अंतर्गत नोटीस बजावून त्यांच्याकडून जागेसंदर्भातील कागदपत्रे पडताळून पाहावी आणि जर त्या जागेच्या वापरात अनियमितता आढळून आल्यास नियम १५२ अंतर्गत नोटीस बजावून त्यांच्याकडून वाढीव दराने मालमत्ता कराची वसूल केली जाईल. त्यामुळे जागेचा गैरवापर केला जात असल्यास मालमत्ता कराच्या रकमेच्या तुलनेत दोनशे टक्के दंड वसूल केला जाणार आहे. अशाप्रकारे प्रत्येक वर्षी अशाप्रकारे आयटी पार्कच्या (IT Park) नावाखाली बांधकाम केलेल्या इमारतीतील गाळेधारकांकडून कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (IT Park)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.