मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘लॉट-१२’ अंतर्गत मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमध्ये एकूण मिळून ७७ ठिकाणी सामुदायिक शौचालये (community toilets) बांधकामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे तर ७२ ठिकाणी शौचालय बांधकामांचे आराखडे मंजूर झाले आहेत. पश्चिम उपनगरातील कंत्राटदारांनी निश्चित केलेल्या मुदतीत सामुदायिक शौचालयांचे (community toilets) काम पूर्ण करावेत अन्यथा त्यांना ५ लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारावा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत. (MCGM)
राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या आदेशानुसार, मुंबईतील सामुदायिक शौचालय (community toilets) बांधण्याच्या कामाची आढावा बैठक शुक्रवारी १६ फेब्रुवारी २०२४ रोजी पार पडली. त्यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. शिंदे यांनी सर्व संबंधितांना योग्य ते निर्देश दिले. (MCGM)
(हेही वाचा – Punyeshwar Temple उभारणीचा सुनील देवधर यांचा निर्धार)
३० आराखडे मंजूर
शहर विभागामध्ये सामुदायिक शौचालय (community toilets) बांधकामाचे १८ नकाशे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी वस्ती स्वच्छता कार्यक्रम विभागाने ८ आराखडे मंजूर केले आहेत. पूर्व उपनगर विभागामध्ये सल्लागारांनी ९४ नकाशे सादर केले, त्यापैकी ४० नकाशांची छाननी वस्ती स्वच्छता कार्यक्रम विभागाने केली. ३० आराखडे मंजूर करण्यात आले आहेत तर एकूण ४० ठिकाणी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. (MCGM)
पश्चिम उपनगर विभागामध्ये सल्लागारांनी ९५ नकाशे मंजुरीसाठी सादर केले. त्यापैकी ४९ नकाशांची छाननी वस्ती स्वच्छता कार्यक्रम विभागाने केली. ३४ शौचालयांचे आराखडे मंजूर करण्यात आले असून १७ ठिकाणी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरातील कंत्राटदारांच्या कामांच्या प्रगतीबाबत असमाधान व्यक्त करत कंत्राटदारांच्या कामाचा प्रगतीनिहाय आढावा घ्यावा व कामाचे मूल्यमापन करुन ५ लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. शिंदे यांनी संबंधितांना दिले. (MCGM)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community