Coastal Road वर ठिकठिकाणी अग्निशमन केंद्रांची निर्मिती! लवकरच सुरू होणार ठाकूर व्हीलेज केंद्र

मुंबई अग्निशमन दलात नुकतेच ४६८ नवीन अग्निशमन जवान रुजू झाले आहेत. लवकरच सुमारे २५० जवानांची नियुक्ती होणार आहे.

181
Coastal Road Project ला विलंब करणाऱ्या कंत्राटदाराला फक्त 35 कोटींचा दंड

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प मार्गावर ठिकठिकाणी अग्निशमन केंद्रांची निर्मिती करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी चर्चा करण्यात येईल, असेही महाताविका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले. तसेच कांदिवली (पूर्व) ठाकूर व्हिलेज येथे अग्निशमन केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि लवकरच त्याचे लोकार्पण होईल, असेही जाहीर केले. (Coastal Road)

सुमारे ९० मीटर उंच अंतरावर पोहोचणारी शिडी

मुंबई अग्निशमन दलाच्या भायखळा येथील मुख्यालयात भूषण गगराणी यांनी सोमवारी २० मे २०२४) सकाळी प्रत्यक्ष भेट देऊन सुमारे तीन तास आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. आढावा बैठकीपूर्वी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी अग्निशमन दलाची वाहने, विविध उपकरणे तसेच तंत्रज्ञानांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामध्ये अग्निशमन यंत्र, फायर इंजिन, फोम टेंडर्स, फायर रोबोट, कंट्रोल पोस्ट व्हॅन, फायर बाईक आदींचा समावेश होता. दरम्यान, त्यांनी फायर इंजिनच्या शिडीच्या साहाय्याने जमिनीपासून सुमारे ९० मीटर उंच अंतरावर जाऊन पाहणी केली. (Coastal Road)

(हेही वाचा – Hunt For New Coach : मुख्य प्रशिक्षक पदासाठी आता बीसीसीआयच्या रडारवर स्टिफन फ्लेमिंग)

मुंबईत एकूण ३५ अग्निशमन केंद्रे

मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल हे १८८७ पासून कार्यरत आहे. मुंबईत एकूण ३५ अग्निशमन केंद्रे आहेत. त्यापैकी शहर विभागात १५, पूर्व उपनगरांत ७ आणि पश्चिम उपनगरांत १३ सुसज्ज अशी अग्निशमन केंद्रे आहेत. तसेच एकूण १९ लघू अग्निशमन केंद्र आहेत. त्यापैकी शहर विभागात ४, पूर्व उपनगरात ८ आणि पश्चिम उपनगरात ७ लघू अग्निशमन केंद्र आहेत. तसेच २२ विभागस्तरीय (वॉर्ड) अग्निशमन केंद्र आहेत. (Coastal Road)

मुंबईकरांच्या सुरक्षितेच्या अनुषंगाने संकटसमयी जलद प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने मुंबई अग्निशमन दलाकडे एकूण ३०३ वाहने आहेत त्यात फायर इंजिन, फोम टेंडर्स, वॉटर बॉऊझर्स, एरियल लॅडर प्लॅटफॉर्म्स, हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म्स, टर्न टेबल लॅडर्स, बचाव वाहने, नियंत्रण कक्ष असलेले वाहन, फायर रोबोट, फायर बाईक, मोबाइल डिझेल डिस्पेन्सिंग व्हेईकल, एससीबीए वाहन आदींचा समावेश आहे. आग लागणे, इमारत पडणे, वाहन अपघात, झाडे पडणे, चक्रीवादळ, भूकंप, पूर, भूस्खलन, रासायनिक संकट, तेल-वायू गळती, अतिरेकी हल्ला आदी संकटसमयी नागरिकांच्या मदतीसाठी मुंबई अग्निशमन दल तत्पर असते. (Coastal Road)

संशोधनात्मक माहिती गोळा करणारे स्वतंत्र अभ्यासक

सध्या मुंबई अग्निशमन दलाकडून सुरक्षेच्या दृष्टीने इमारतींमध्ये अग्निशमनविषयक यंत्रणा आहे किंवा नाही हे यादृच्छिक (randomly) पद्धतीने तपासले जाते. परंतु, त्यासाठी एखादी प्रणाली दलाने विकसित करावी. जगभरात होत असलेले नवनवीन प्रयोग, अद्ययावत प्रणाली याविषयीची संशोधनात्मक माहिती गोळा करणारे स्वतंत्र अभ्यासक निर्माण करावे. (Coastal Road)

लवकरच सुमारे २५० जवानांची नियुक्ती

मुंबई अग्निशमन दलात नुकतेच ४६८ नवीन अग्निशमन जवान रुजू झाले आहेत. लवकरच सुमारे २५० जवानांची नियुक्ती होणार आहे. त्यांना विविध प्रकारच्या संकटाशी लढा देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल. आगामी काळात अग्निशमन कर्मचाऱ्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी, वजन आणि शरीराची ठेवण यांच्या सक्षमतेच्या आधारावर पदोन्नतीसाठी विचार करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. (Coastal Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.