Mumbai Pune Expressway वरील पुलाचे गर्डर बसविण्यासाठी पुणे वाहिनीवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार

121
Express Way Block: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील पुण्याकडे जाणारी मार्गिका बुधवारी ३ तास बंद

Mumbai Pune Expressway वर कि.मी. ३३/८०० येथे खोपोली ते पालीफाटा (एन.एच.१६६ डी) या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाचे गर्डर बसविण्याचे काम २८ नोव्हेंबर रोजी करण्याचे नियोजन असून या लांबीत पुणे वाहिनीवरील वाहतूक दुपारी १२ ते ३ वा. या कालावधीत पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक द्रुतगती मार्गाच्या मुंबई वाहिनीमधून अंदाजे १ कि.मी. लांबीसाठी पुण्याच्या दिशेने प्रतिबंधित वेगाने वळविण्यात येणार आहे. तसेच याच कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सदर लांबीत नेहमीप्रमाणे मुंबईच्या दिशेने सुरु राहील. काम पूर्ण झाल्यावर दुपारी ३ वाजता मुंबईहुन पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा पुणे वाहिनीमधून सुरु करण्यात येईल.

या कालावधी दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ९८२२४९८२२४ वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर सपंर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

(हेही वाचा Aayodhya Ram Mandir : सरन्याधीशांविरोधात महाभियोग चालवणे, राम मंदिराचा निकाल रोखणे कपिल सिब्बलांचे होते षडयंत्र; माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा गौप्यस्फोट )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.