पुणे प्रवासी विमानतळावरील नव्या इमारतीचे बांधकाम ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर विमानतळाची प्रवासी हाताळण्याची क्षमता वाढणार आहे. ‘भारतीय विमानतळ प्राधिकरणा’च्या (एएआय) पुणे विमानतळावर वर्धित क्षमतेसह आणि जागतिक दर्जाच्या सुविधांसह नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ज्यामुळे विमानतळावर गर्दी कमी होईल. ‘एएआय’ने टर्मिनल इमारतीचे बांधकाम 475 कोटी रुपये खर्चून हाती घेतले आहे. यापैकी 55 टक्क्यां पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे.
शनिवारवाडा प्रतिकृती
नव्या इमारतीत 360 मीटर व्हरांड्यामध्ये महाराष्ट्र आणि पुण्याचा सामाजिक, ऐतिहासिक, कला, सांस्कृतिक वारसा सांगणारे भित्तीचित्र लावण्यात आले आहे. शिवाय, तेथेच शनिवारवाड्याच्या आतील संरचनेपासून प्रेरित होऊन प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
( हेही वाचा : सिंधुदुर्गातील ‘ही’ पाच गावे शिमग्यापासून राहणार वंचित! )
अत्याधुनिक सुविधा
याभागात १२० कोटी रुपये खर्च करून बहुमजली वाहनतळ बांधण्यात येणार आहे. हे वाहनतळ जुलै २०२२ पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. येथे १०२४ वाहने पार्क करता येणार आहेत. या विमानतळावर अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. खानपान आणि रिटेल आऊटलेट्ससाठी ३६ हजार चौरस फूट जागेची तरतूद प्रवाशांच्या अल्पोपहारासाठी/सुखसोयींसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community