महासागराच्या सखोल अन्वेषणासाठी NCPOR कडून नव्या महासागर संशोधक जहाजाची उभारणी

84
महासागराच्या सखोल अन्वेषणासाठी NCPOR कडून नव्या महासागर संशोधक जहाजाची उभारणी

केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील एनसीपीओआर अर्थात राष्ट्रीय ध्रुवीय तसेच महासागरी संशोधन केंद्र भारताच्या सखोल महासागरी मोहिमेचा भाग म्हणून एका नव्या महासागरी संशोधन जहाजाची बांधणी करत आहे. हे जहाज हिंदी महासागरातील खोलवर भागांमध्ये दुर्मिळ खनिजे आणि धातूंचा शोध घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. (NCPOR)

केंद्र सरकारच्या “आत्मनिर्भर भारत” उपक्रमाअंतर्गत, कोलकाता येथील गार्डन रीच जहाजबांधणी आणि अभियांत्रिकी (जीआरएसई) कंपनीतर्फे या नव्या बहुशाखीय संशोधन जहाजाची उभारणी करण्यात येईल. एनसीपीओआर संस्थेचे संचालक डॉ. थंबन मेलोथ आणि केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयातील कार्यक्रम प्रमुख कमांडर पी. के. श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत नुकत्याच एनसीपीओआर येथे आयोजित कार्यक्रमात, जीआरएसईचे जहाजबांधणी विभागाचे संचालक कमांडर शंतनू बोस आणि एनसीपीओआरमधील जहाज परिचालन आणि व्यवस्थापन विभाग प्रमुख एम. एम. सुब्रमण्यम यांनी या संदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या केल्या. (NCPOR)

एकूण ८९.५ मीटर लांबीचे हे अत्याधुनिक महासागरशास्त्रविषयक जहाज खोल समुद्री संशोधनासाठी भारतीय जहाज बांधणी कारखान्यात उभारण्यात येत असलेले सर्वात मोठे संशोधन जहाज असेल. एकूण ८३९.५५ कोटी रुपये कंत्राट मूल्य असलेले हे जहाज जीआरएसईमध्ये ३६ महिन्यांच्या कालावधीत पूर्णपणे तयार होईल. हे जहाज, केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयातर्फे हाती घेण्यात येणाऱ्या खोल समुद्रातील वैज्ञानिक सर्वेक्षणे आणि नमुने संकलन या मोहिमांसाठी वापरण्यात येईल. या जहाजाचा कमाल वेग ताशी १४ नॉटिकल मैल इतका असेल आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा, शास्त्रीय उपकरणे आणि सुविधा यांनी हे जहाज सुसज्ज असेल. (NCPOR)

(हेही वाचा – Digital Payments : भारतात डिजिटल पेमेंट्‌सच्या वाढीसाठी हवे सोपे केवायसी नियम)

‘मेक इन इंडिया’ ला देणार योगदान 

महासागरशास्त्राचे सर्व पैलू आणि खोल समुद्रातील खनिज संशोधनाचा समावेश असलेले हे जहाज खऱ्या अर्थाने बहुशाखीय जहाज असेल. या जहाजामध्ये मल्टीबीम बाथीमेट्री यंत्रणा, मल्टीचॅनेल सेस्मिक्स, विविध महासागरी प्रॉलीफर्स, समुद्राच्या तळाशी जाऊन नमुने संकलित करणारे सँपलर्स, ऑनबोर्ड अॅनालिटिकल यंत्रणा तसेच अशा जहाजात असणे आवश्यक आहे अशी सर्व प्रकारच्या हेवी ड्युटी यंत्रसामग्री अशा महत्त्वाच्या सुविधांनी हे जहाज सुसज्जित असेल. जहाजाची अत्यंत अचूक हालचाल तसेच समुद्रातील अत्यंत अचूकता बाळगून केल्या जाणाऱ्या वैज्ञानिक परिचालनासाठी आवश्यक असलेला विविक्षित ठिकाणाचा नेमका शोध घेणे शक्य करणारी डीपी२ डायनॅमिक स्थितीदर्शक यंत्रणा देखील या जहाजावर बसवली जाईल. संशोधनविषयक कार्य करताना जहाजामुळे पाण्याखाली उत्सर्जित होणाऱ्या आवाजाचे प्रमाण कमी करण्यासाठी सायलेंट ए या विशिष्ट मानकासह या जहाजाची संरचना करण्यात आली आहे. (NCPOR)

सर्व प्रकारच्या हवामानात टिकून राहून कार्य करण्याची क्षमता या जहाजात असेल. हे जहाज एकाचवेळी ३४ वैज्ञानिकांना वाहून नेऊ शकेल आणि ते आगामी ३० वर्ष भारताच्या सेवेत कार्यरत राहील. हे नवे जहाज इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग (आयआरएस) तसेच अमेरिकन ब्युरो ऑफ शिपिंग (एबीएस) अशा दुहेरी वर्गवारीच्या अंतर्गत उभारण्यात येईल आणि हे जहाज आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने (आयएमओ) अलीकडे आखून दिलेल्या एमएआरपीओएल (सागरी प्रदूषण) मानकांचे पालन करणारे असेल. या संशोधक जहाजाची जीआरएसईतर्फे होत असलेली उभारणी भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमात खऱ्या अर्थाने योगदान देणारी आहे. (NCPOR)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.