तीन वर्षांनंतरही टप्पा ११ मधील दीड हजार शौचकुपांची कामे लटकलेलीच

139

मुंबईमध्ये टप्पा ११ अंतर्गत सुमारे २२ हजार शौचालय अर्थांत शौचकुपांची उभारणीचे लक्ष्य निर्धारित करत महापालिकेने २४ विभागांसाठी कंत्राटदारांची निवड केली. पण पुढे प्रत्यक्षात मुंबईत १९ हजार ८४४ शौच कुपांची उभारणी करण्याचे सुधारीत केली. परंतु त्यातील आतापर्यंत केवळ १८ हजार ३९९ शौचकुपांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे तीन वर्षांनंतरही टप्पा ११ पूर्ण होऊ शकला नसून आजही मुंबईतील सुमारे १५४५ शौचकुपांची काम लटकलेलीच असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, आयुक्त तथा प्रशासकांनी आणखी २० हजार नवीन शौचकुपांच्या बांधणीचा प्रकल्प लवकरच हाती घेतला जाणार असल्याची घोषणा केली आहे.

( हेही वाचा : मुंबईच्या मुच्छड पानवाल्यासह १२ पान विक्रेत्यांना अटक; साडेतेरा लाख रुपयांचे ई सिगारेट जप्त)

वस्ती स्वच्छ कार्यक्रम अंतर्गत टप्पा ११(आर)मध्ये सुमारे २० हजार शौचकुपांची पुनर्बांधणी करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी केला असला तरी प्रत्यक्षात आतापर्यंत १८ हजार ३४९ शौचकुपांची उभारणी झाल्याची आकडेवारीच समोर येत आहे.

संपूर्ण मुंबईत वस्ती स्वच्छता कार्यक्रमाअंतर्गत एकूण २२ हजार ७७४ शौचालयांकरता निविदा काढून त्या कामांना मंजुरी देण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात या कामांना मार्च २०१९मध्ये सुरुवात झाली आहे. त्यामध्ये ८ हजार ६३७ ही नवीन शौचकुपे आणि १४ हजार १३७ जुन्या शौचकुपांच्या जागी पुनर्बांधकाम करण्यात येणार. त्यानुसार ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी २० हजार ३०१ शौचकुपांचे बांधकाम पूर्ण करण्याचे ध्येय प्रशासनाने ठेवले होते, तर मार्च २०२१पर्यंत ४ हजार ५९६ शौचकुपे बांधून तयार झाली होती व उर्वरीत १५ हजार ७०५ शौचकुपांचे बांधकाम सुरु होते.

परंतु पुढे २२ हजार ७७४ शौचकुपांऐवजी १९ हजार ८४४ शौचकुपे बांधण्याचे सुधारीत केले. त्यातील डिसेंबर १८ हजार ३४९ शौचकुपांची कामे पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये ८३४ शौचालयांच्या तुलनेत आतापर्यंत ७७३ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या एका शौचालयांमध्ये पाच ते वीसपर्यंत शौचकुपांचे बांधकाम केले गेले आहे.

पुढील वर्षांमध्ये टप्पा १२ मध्ये नवीन २० हजार शौचालय उभारणीची घोषणा केली असून यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.