ऑस्‍ट्रेलियन दूतावासाच्या वाणिज्यदूतांची महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांनी ऑस्ट्रेलियन दूतावासाचे मुुंबईतील वाणिज्यदूत पीटर ट्रसवेल आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांचे स्वागत केले.

ऑस्ट्रेलियन दूतावासाचे मुुंबईतील वाणिज्यदूत पीटर ट्रसवेल यांनी शिष्‍टमंडळासह मुंबई महानगरपालिका मुख्‍यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला शुक्रवारी, ९ जुलै रोजी सदिच्छा भेट दिली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, संचालक (आपत्कालीन व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांनी ट्रसवेल आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांचे स्वागत केले. पीटर ट्रसवेल यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची कार्यपद्धती समजून घेतली. निरनिराळ्या आपत्तींमध्ये विविध यंत्रणांचा असलेला सहभाग, विभागीय स्तरावर आपत्कालीन व्यवस्थापनाचे करण्यात आलेले विकेंद्रीकरण इत्यादींबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली. कोविड- १९ विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी मुंबई महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना, ज्यामध्ये मुख्यतः उपलब्ध रुग्णशय्यांचा डॅशबोर्ड, रुग्णवाहिका, शववाहिनी व्यवस्थापन याबाबतची माहिती देण्यात आली. कोविड- १९ विषाणू प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण जास्तीत जास्त वेगाने व्हावे, यासाठी महानगरपालिका करीत असलेली कार्यवाही, मुंबईत विविध दूतावासात कार्यरत असणारे अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या विशेष व्यवस्थेचीही माहिती त्यांना उपलब्ध करुन देण्यात आली. मुंबई महानगरपालिकेने केलेले आपत्ती व्यवस्थापन व कोविड- १९ विषाणू संसर्ग रोखण्‍यासाठी केलेल्‍या व्यवस्थापनामुळे आपण प्रभावित झाल्याचे पीटर ट्रसवेल यांनी नमूद केले. तसेच महानगरपालिका प्रशासनाच्‍या कामकाजाचे कौतुक केले. ट्रसवेल यांच्‍या समवेत उप वाणिज्‍यदूत मायकल ब्राऊन आणि जेन विल्‍यम्‍स हेदेखील उपस्थित होते.

(हेही वाचा : सेनेच्या मुंबई महापालिकेत परप्रांतीय कंत्राटदाराला झुकते माप, मराठी कंत्राटदार प्रतीक्षेत!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here