बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या भविष्यातील विस्तारासाठी करण्यात आलेल्या पाण्याच्या नियोजनास मंजुरी तसेच चंद्रपूर येथे प्रस्तावित असलेल्या आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या निर्मीतीसाठी सल्लागार नेमण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या संचालक मंडळाची २०८ वी बैठक वनमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील हिंगणा रोडवर स्थित महामंडळाच्या मुख्यालयात पार पडली. प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय. एल. पी. राव, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, मुख्य महाव्यवस्थापक संजीव गौड, कंपनी सचिव सौरभ सिंह उपस्थित होते. या बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
(हेही वाचा – प्राथमिक शाळांमध्ये शिकवले पाहिजे Good Touch, Bad Touch; व्हिडिओ होतोय व्हायरल)
गोरेवाडा प्रकल्पांतर्गत भविष्यात सुरु करण्यात येणाऱ्या आफ्रिकन सफारी, नाईट सफारी, गोंडवाना संग्रहालय आदी प्रकल्पांच्या संचलनासाठी पाण्याच्या व्यवस्थेचे नियोजन नागपूर महानगरपालिकेमार्फत आणि महामंडळाने पाईपलाईनद्वारे करण्यास मान्यता देण्यात आली. गोरेवाडाच्या धर्तीवर चंद्रपूर येथे प्रस्तावित असलेल्या प्राणी उद्यानाच्या निर्मितीसाठी महामंडळाला सल्लागार नेमण्या करिता निविदेची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
हा प्रस्ताव सरकारकडून मंजुरीसाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना मुनगंटीवार यांनी दिल्या. सेंट्रल व्हिस्टा (नवीन संसदभवन), राम जन्मभूमी निर्माणासाठी महामंडळाच्यावतीने मागणीनुसार चिरान सागवान पाठविण्यात आले होते. तसेच, राम जन्मभूमी निर्माणासाठी अतिरिक्त सागवान पाठवण्याची मंजुरी महामंडळाच्या बैठकीत करण्यात आली. उर्वरित चिरान सागवानापासून महामंडळाने फर्निचर व इतर वस्तु तयार करण्याच्या सूचना मुनगंटीवार यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community