Aquaguard कंपनीकडून ग्राहकांची फसवणूक; सर्व्हिसिंगच्या नावाखाली होतेय लूट 

Aquaguard तुम्ही तुमच्या ग्राहकांची खरोखर काळजी करता का? 3-4 महिन्यांहून अधिक काळ उलटला तुम्ही माझ्या Aquaguard समस्येचे निराकरण केले नाही. मी तुमच्याकडून वाढीव वॉरंटी घेतली होती. उत्तरदायित्व काही नाही.. लाज वाटली पाहिजे @EurekaForbes, अशा शब्दांत जतीन यांनी संताप व्यक्त केला आहे.

254

सध्याच्या वातावरणातील प्रदूषण लक्षात घेऊन घराघरात Aquaguard चे पाणी शुद्धीकरणाचे मशीन बसवले जाते. या मशीनची दर तीन महिन्याने सर्व्हिसिंग करणे आवश्यक असते. त्यामुळे ग्राहक त्यानुसार कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला संपर्क करत असतात, ऑनलाईन पैसे भरतात, त्यानंतर मात्र कंपनी ग्राहकांना अक्षरशः वाऱ्यावर सोडून जाते. ना त्यांना कोणता प्रतिसाद देत, ना सर्व्हिसिंगसाठी कुणी येत. अशा प्रकारे कंपनीकडून ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे.

aqua

३ हजार ६५५ रुपये घेतले पण सेवा पुरवली नाही  

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे राहणाऱ्या चित्रा सावरकर यांनी त्यांच्याकडील Aquaguard च्या मशीनच्या सर्व्हिसिंगसाठी ३ जुलै २०२४ रोजी ३ हजार ६५५ रुपये ऑनलाईन भरले. त्यानंतर कंपनीने ९ जुलै २०२४ रोजी चित्रा सावरकर यांना त्यांच्याकडे राहुल कुमार सर्व्हिसिंगसाठी येतील, असे कळवले. मात्र राहुल कुमार दोन आठवडे उलटले तरी आलेच नाहीत. चित्रा सावरकर यांनी पैसे भरूनही त्यांना Aquaguard कंपनीच्या सर्व्हिसची केवळ प्रतीक्षा करावी लागत आहे. याविषयी त्यांनी Aquaguard कंपनीला वारंवार संपर्क केला तरी त्यांना कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. विशेष म्हणजे कंपनी वाढीव वॉरंटी घेते, ग्राहकही लागलीच पैसे भरतात, पण प्रत्यक्षात सर्व्हिस देत नाहीत.  Aquaguard कंपनीचा हा संतापजनक अनुभव केवळ चित्रा सावरकर यांनाच येत नाही, तर देशभरातील हजारो ग्राहकांना असा अनुभव येत आहे. कंपनी सर्व्हिसिंगच्या नावाखाली ग्राहकांकडून पैसे घेते, मात्र सर्व्हिसिंगसाठी कुणाला पाठवत नाही. याविषयी अनेक ग्राहकांनी ऑनलाईन संताप व्यक्त केला आहे.

(हेही वाचा ‘ओम् प्रमाणपत्र’ केवळ प्रसाद आणि पूजा साहित्यापुरते मर्यादित नसणार; हिंदूंना सर्वच गोष्टी पवित्र मिळाल्या पाहिजेत; Ranjit Savarkar यांची घोषणा)

चार महिने सर्व्हिस पुरवली नाही 

पुणे स्थित राहणारे हर्षित यांनी एप्रिल २०२४ मध्ये सर्व्हिसिंगसाठी कंपनीला संपर्क केला, मात्र चार महिने उलटले तरी त्यांच्याकडे कंपनीने सर्व्हिसिंगसाठी कुणाला पाठवले नाही. त्यांनी याविषयीचा संताप X वरती व्यक्त केला आहे. मी दररोज सर्व्हिसिंग सेंटरला संपर्क करत आहे, पण काहीही प्रतिसाद मिळत नाही, असे हर्षित म्हणाले आहेत.

Aquaguard खरेदी न करण्याचे केले आवाहन 

तपन संपथ यांनीही सर्व्हिसिंगसाठी Aquaguard कंपनीला संपर्क केला. त्यांनी सर्व्हिसिंगसाठी पैसे भरले, पण त्यांच्याकडे कुणीही आले नाही. त्यामुळे त्यांनीही X वर संताप व्यक्त केला आहे. ‘मी दररोज सर्व्हिस सेंटरला संपर्क करत आहे. पण प्रतिसाद मिळत नाही. Aquaguard चा दिवसेंदिवस वाईट अनुभव येत आहे. पैसे भरूनही कंपनी दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कुणीही या कंपनीकडून खरेदी करू नका, असे संपथ म्हणाले.

वाढीव वॉरंटी घेऊनही सेवा पुरवत नाहीत 

जतीन यांनीही कंपनीकडे सर्व्हिसिंगसाठी संपर्क केला पण ४ महिने झाले तरी कंपनीने त्यांना प्रतिसाद दिला नाही. जतीन यांनीही याविषयीचा संताप X वर व्यक्त केला आहे. जतीन म्हणतात, Aquaguard तुम्ही तुमच्या ग्राहकांची खरोखर काळजी करता का? 3-4 महिन्यांहून अधिक काळ उलटला तुम्ही माझ्या Aquaguard समस्येचे निराकरण केले नाही. मी तुमच्याकडून वाढीव वॉरंटी घेतली होती. उत्तरदायित्व काही नाही.. लाज वाटली पाहिजे @EurekaForbes

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.