राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पुन्हा चौथ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी मुंबईत ९६१ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातही एका दिवसात नव्या कोरोना रुग्णांची नोंद १ हजार ४९४ पर्यंत पोहोचल्याने रुग्ण बरे होण्याचा टक्का पुन्हा घसरला आहे. राज्यात आता रुग्ण वाढीचे प्रमाण ९८.०४ टक्क्यांवर नोंदवले गेले आहे.
रुग्णसंख्येत वाढ
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यभराच्या तुलनेत मुंबईत ५० टक्क्यांहून जास्त रुग्ण आढळून येत आहेत. राज्यभरात आढळणा-या नव्या रुग्ण वाढीच्या तुलनेत दर दिवसाला पन्नास टक्क्यांहून कमी रुग्ण बरे होत आहेत. मुंबई, ठाणे आणि पुण्यापाठोपाठ आता पालघर, रायगड जिल्ह्यांतील कोरोना रुग्ण संख्येने शंभरी पार केली आहे. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेची चांगलीच त्रेधातिरपीट झाली आहे. राज्यात आता ६ हजार ७६७ कोरोना रुग्णांवर विविध जिल्ह्यांत उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
(हेही वाचाः कोरोना वाढतोय, शाळा सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती)
जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची संख्या
मुंबई – ४ हजार ८८०
ठाणे – ९६०
पुणे – ५०१
रायगड – १६७
पालघर – १००