मुसळधार पावसाची वेधशाळेची अपेक्षा फोल ठरली तरी सोमवारी मुंबईत दुपारनंतर संततधार दिसून आली. मात्र पावसाचा फारसा जोर नसल्याने कमाल तापमान 31.4 अंश सेल्सिअस तर सांताक्रूझमध्येही 32.2 अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. मुंबईत रात्रीही संततधार राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान वर्तवला आहे.
गेल्या सहा तासांत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 31.5, कुलाब्यात 47.5, चेंबूरला 34.5, भायखळ्यात 16.5, मुंबई विमानतळ परिसरात 21.5, जुहू विमानतळ 13, सांताक्रूझ 18, विद्याविहार येथे 38. 5 अंश सेल्सिअस एवढ्या पावसाची नोंद झाली. मंगळवारीही मुंबईतील काही भागात मुसळधार पावसाची मुंबई प्रादेशिक हवामान खात्याला अपेक्षा आहे.
Join Our WhatsApp Community