अमरावती मधील विभागीय सेवा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या डॉक्टर,नर्स, कर्मचारी यांचे मागील चार ते पाच महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याने संतप्त डॉक्टर, नर्स आदी कर्मचारी यांनी काम बंद आंदोलनाचा आज इशारा दिला आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत वेतन न मिळाल्यास एक एप्रिल पासून कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
( हेही वाचा : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ज्येष्ठांसह बच्चे कंपनीला ट्रॉली वाहने )
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या
आगामी २८ तारखेपर्यंत हे कर्मचारी काळ्या फिती लावून तर २९ तारखेला ठिय्या आंदोलन करणार आहे. २५ एप्रिल ते २८ मार्च काळ्या फिती लावून काम, २९ मार्च ला ठिय्या आंदोलन, २९ मार्च ते ३१ मार्च फक्त अत्यावश्यक सेवा व १ एप्रिल पासून मात्र पूर्णतः बेमुदत आंदोलन हे आरोग्य कर्मचारी करणार आहेत. या आरोग्य कर्मचाऱ्यांचा अनेक दिवसांपासून थकीत पगार बाकी आहे. तो देण्यात यावा दर महिन्याचे वेतन हे १ किंवा २ तारखेला व्हावे व संपूर्ण भत्ते इतर मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात अशी मागणी या आरोग्य कर्मचाऱ्यांची आहे.
Join Our WhatsApp Community