मुंबईत मागील चार दिवसांपासून रुग्णवाढीवर नियंत्रण!

वाढणाऱ्या रुग्णांचा आकडा हळूहळू वाढताना दिसत असून, मुंबईकरांसाठी ही समाधानाची बाब आहे.

मुंबईत मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आता गोगलगायीच्या चालीने वाढत चालली आहे. मागील दिवसांमध्ये १३० व ४००ने रुग्णसंख्या वाढली गेली. बुधवारी संपूर्ण दिवसामध्ये १० हजार ४३८ रुग्ण आढळून आले आहेl. ४ एप्रिल रोजी एकाच दिवशी ११ हजार १३६ रुग्ण आढळून आल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी हा आकडा १ हजार २८० ने घटून १० हजार ३०वर आली आहे. त्यानंतर वाढणाऱ्या रुग्णांचा आकडा हळूहळू वाढताना दिसत असून, मुंबईकरांसाठी ही समाधानाची बाब आहे.

गुरुवारी दिवसभरात १० हजार ४२८ रुग्ण

मुंबईमध्ये बुधवारी दिवसभरात १० हजार ४२८ बाधित रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात ६ हजार ०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दिवसभरात २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या २३ मृत रुग्णांपैकी १४ रुग्ण हे दीर्घकालीन आजारी होते. यामध्ये १४ पुरुष आणि ९ महिलांचा समावेश आहे. यामध्ये एका मृताचे वय हे चाळीशीखालील आहे. संपूर्ण मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा ८० टक्के एवढा आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा ३५ दिवसांवर आला आहे.

(हेही वाचाः ब्रेक दि चेन संदर्भात राज्य शासनाच्या नव्या स्पष्ट सूचना! कसे आहेत नियम?)

अशी आहे परिस्थिती

सध्या ८१ हजार ८८६ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातील १७ हजार ४३१ रुग्ण हे जास्त लक्षणे व गंभीर रुग्णांसाठी असलेल्या तसेच, मध्य व दीर्घकालीन आजार असलेल्या डीसीएच, डीसीएचसीमध्ये उपचार घेत आहेत. लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेले ५ हजार ६११ रुग्ण हे सीसीसीटू मध्ये उपचार घेत आहेत. याशिवाय २ हजार ५६ आयसीयू बेड व १० हजार ७२५ ऑक्सिजन खाटांवर अन्य रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. गुरुवारपर्यंत ७२ झोपडपट्टया व चाळी कंटेन्मेंट झोनमध्ये असून, ७८९ इमारती या सीलबंद करण्यात आल्या आहेत. संपूर्ण दिवसभरात बाधित रुग्णांच्या संपर्कातील अती जोखमीच्या ३५ हजार ८४० रुग्णांचा शोध घेण्यात आला असून, सध्या सीसीसी वनमध्ये १ हजार ३७ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

दिनांक             बाधित रुग्ण             रुग्ण वाढ

३० मार्च              ४७५८                     –

३१ मार्च              ५३९४                    ६३६

१ एप्रिल              ८६४६                   ३२५२

२ एप्रिल              ८८३२                    १८६

३ एप्रिल              ९०९०                    २५८

४ एप्रिल              ११ १३६                  २०४६

५ एप्रिल              ९८५७                   १२७९(घट)

६ एप्रिल              १००३०                   १३०

७एप्रिल               १०४२८                  ४००

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here