अत्यंत हीन दर्जाचे आणि अश्लील विनोद होत असल्याने वादग्रस्त बनलेल्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ (India’s Got Latent) या कार्यक्रमाचा शो रद्द झाला आहे. आधीच रणवीर इलाहाबादिया आणि समय रैना यांच्याकडून वादग्रस्त विनोद निर्मिती केल्यामुळे या शोवर (India’s Got Latent) जोरदार टीका होऊ लागली. हाच फटका आता या शोमध्ये विनोदी कलाकार अनुभव सिन्हा बस्सी यालाही बसला आहे. शनिवारी, १५ फेब्रुवारीला लखनऊ येथे होणारा या कार्यक्रमाचा शो रद्द करण्यात आला आहे.
अनुभव सिन्हाचा शो (India’s Got Latent) लखनऊमधील गोमती नगर येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये दुपारी ३.३० आणि संध्याकाळी ७ वाजता होणार होता. पोलिस शोमध्ये पोहोचले आणि लखनऊ विकास प्राधिकरणाने विनोदी कलाकाराला परत पाठवले. हा वाद शोमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषेबद्दल आणि आशयाबद्दल आहे. या कार्यक्रमाबाबत, उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षा अपर्णा यादव यांनी डीजीपी प्रशांत कुमार यांना पत्र लिहून विनंती केली होती की, या कार्यक्रमांमध्ये महिलांची प्रतिमा मलिन होणार नाही याची खात्री करावी किंवा शाे (India’s Got Latent) पूर्णपणे रद्द करण्याचा विचार करावा. उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षा अपर्णा यादव यांनी डीजीपी प्रशांत कुमार यांना पत्र लिहून शोमध्ये शिष्टाचार राखण्याचे आवाहन केले. १४ फेब्रुवारी रोजी लिहिलेल्या या पत्रात मागील कार्यक्रमांमध्ये अयोग्य भाषेचा वापर अधोरेखित करण्यात आला होता. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शिष्टाचार राखण्याची गरज यावर या पत्रात भर देण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community