हुंडा ही कुप्रथा देशातून हद्दपार होण्यासाठी सरकारने कडक कायदा बनवला आहे. पण याच कुप्रथेला प्रोत्साहन देऊन हुंडा घेण्याचे फायदे जर सांगितले जात असतील तर… होय हे खर आहे. नर्सिंगच्या पाठ्यपुस्तकात हुंडा घेण्याचे फायदे शिकवले जात आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे. नर्सिंगच्या अभ्यासक्रमात समाजशास्त्र या विषयासाठी टी.के. इंद्राणी लिखित पाठ्यपुस्तकामध्ये एका पानावर हुंड्याबद्दलची सर्व माहिती आहे. हुंड्यामुळे नवीन घर, फर्निचर, रेफ्रिजरेटर वगैरे उपकरणांनी सुसज्ज करता येते, असेही या पुस्तकात म्हटले आहे.
अशी पाठ्यपुस्तके काढून टाका
या पाठ्यपुस्तकात हुंड्याच्या फायद्यांविषयी ज्या पानावर माहिती दिली आहे. ते पान सोशल मिडीयावर अपलोड करण्यात आले आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही हे पान आपल्या सोशल मिडीयावर शेअर केले आहे. अशा प्रकारची पाठ्यपुस्तके अभ्यासक्रमातून काढून टाकली जावी अशी मागणी चतुर्वेदी यांनी केली आहे.
Smt.@priyankac19 writes letter to the Education Minister, Govt. of India raising concerns about the regressive content on the Dowry system in the book 'Textbook of Sociology for Nurses'. pic.twitter.com/hFj3G2l2FN
— Office Priyanka Chaturvedi🇮🇳 (@Priyanka_Office) April 4, 2022
कुरुप मुलींचाही होऊ शकतो विवाह
टेक्स्टबुक ऑफ सोशिऑलाॅजी फाॅर नर्सेस असे शीर्षक असलेल्या पाठ्यपुस्तकात हुंड्याचे फायदे या शीर्षकाखाली वादग्रस्त विधाने केली आहेत. मोठा हुंडा देण्याची तयारी असल्यास कुरुप मुलींचा विवाह सुस्वरुप किंवा कुरुप मुलाशी होऊ शकतो असे या पुस्तकात म्हटले आहे. हुंडा पद्धतीचा एक अप्रत्यक्ष फायदा म्हणजे पालक आपल्या मुलींना उच्च शिक्षण देऊ लागले आहेत. मुली जास्त शिकलेल्या असल्या म्हणजे कमी हुंडा द्यावा लागतो असे विधानही या पाठ्यपुस्तकात आहे.
Join Our WhatsApp Community