गांधींविषयी आक्षेपार्ह विधान करणारे कालीचरण महाराजांना अटक

80

मोहनदास करमचंद गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे कालीचरण महाराज यांना अखेर अटक करण्यात आली आहे. रायपूर पोलिसांनी कालीचरण महाराजांना खजुराहो येथील हॉटेलमधून अटक केली आहे. पोलिस दुपारपर्यंत कालीचरण यांना रायपूरला घेऊन जातील. महाराज कालीचरण यांच्यावर टिकरापारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित धर्मसंसद 2021चा कार्यक्रमा दरम्यान, शेवटच्या दिवशी संत कालीचरण यांनी गांधींबद्दल अपशब्द वापरत देशाच्या फाळणीला गांधींना जबाबदार धरले. कालीचरण यांचे वादग्रस्त विधान व्हायरल झाल्यानंतर कालीचरण यांच्यावर रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कालीचरण महाराजांना विरोध 

रायपूर शहरातील रावण भटा मैदानावर दोन दिवसीय धर्मसंसद कार्यक्रमाच्या समारोपावेळी कालीचरण म्हणाले, इस्लामचे ध्येय राजकारणाच्या माध्यमातून राष्ट्रावर कब्जा करणे आहे. 1947 मध्ये आमच्या डोळ्यांसमोर त्यांनी कब्जा केला होता. आधी इराण, इराक आणि अफगाणिस्तान ताब्यात घेतले. राजकारणाच्या जोरावर त्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तान काबीज केले. मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या केल्याबद्दल मी नथुराम गोडसेला सलाम करतो. असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी यावेळी केले होते. कालीचरण यांच्या या वादग्रस्त विधानावर काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टीका केली. काँग्रेस नेते आणि रायपूर महानगरपालिकेचे अध्यक्ष प्रमोद दुबे यांच्या तक्रारीनंतर कालीचरण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(हेही वाचा महापौरांकडूनच राजशिष्टाचाराची ऐशी तैशी : कॅबिनेट मंत्र्यांनाही पडला विसर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.