लता मंगेशकर यांच्या नावे अभ्यास केंद्र उभारण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या अंगलट!

111

राज्यपालांचे विद्यापीठांवरील कुलपती म्हणून अधिकार काढून घेणारा कायदा संमत केल्याचे काय परिणाम होतात हे लागलीच दिसून येऊ लागले आहे. ज्यांच्या नावाने मुंबई विद्यापीठात प्रगत अभ्यास आणि संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा विद्यापीठाने केली आहे, त्या स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांची साधी परवानगी घेण्याची बुद्धी कुलगुरु सुहास पेडणेकर यांना सूचली नाही, याचे हे द्योतक आहे. आता यावर मंगेशकर कुटुंबियांच्या परवानगीविना कोणताही उपक्रम जाहीर करु नये, अशा शब्दांत मंगेशकर कुटुंबियांचे निकटवर्तीय मयुरेश पै यांनी कुलगुरु सुहास पेडणेकर यांना पत्र लिहिले आहे. जर राज्यपालांचे अधिकार अबाधित असते, तर कुलगुरूंना अशी घिसाडघाई करता आली नसती, त्यांना राज्यपालांची परवानगी घ्यावी लागली असती.

विद्यापीठाची नामुष्की

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने दोन दिवसांपूर्वी गानसम्राज्ञी लता मंगशेकर यांच्या नावाने सेंटर फाॅर एक्सलेंस इन लाईट म्युझिक या प्रगत अभ्यास आणि संशोधन केंद्र सुरु करण्याचा ठराव संमत केला होता. शिवाय त्यांच्या नावे सुवर्णपदकही देण्याचे जाहीर केले, मात्र आता मंगशेकर कुटुंबियांकडून विद्यापीठाने परस्पर घेतलेल्या निर्णयावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठावर मोठी नामुष्की ओढवल्याची प्रतिक्रिया युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली.

( हेही वाचा: हिजाब प्रकरणी आदित्य ठाकरेंचे मोठे विधान! म्हणाले…)

म्हणून घेतला आक्षेप

मयुरेश पै हे लता मंगेशकर कुटुंबियांचे निकटवर्तीय आणि मुंबई विद्यापीठात विकसित होणा-या मास्टर दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय शासकीय संगीत महाविद्यालयाचे समन्वयक आहेत. हे महाविद्यालय स्थापन करण्यासाठी विद्यापीठाकडून दिरंगाई केली जात असल्याने त्यांनी यावर आक्षेप घेतले आहेत, अशी चर्चा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.