Convent occupied Temple Land : कॉन्व्हेंट शाळेने कब्जा केलेली ११ एकर जमीन मंदिराला परत मिळणार; मदुराई खंडपिठाचा आदेश

Convent occupied Temple Land : अरुलमिगु पापनाशस्वामी मंदिराची जागा एका कॉन्व्हेंट शाळेने अनेक दशकांपासून भाडेतत्त्वावर घेतली होती. तमिळनाडू उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने या जागेवरील शाळेची इमारत पाडून जागा मंदिराला द्यावी, असा आदेशही अमाली कॉन्व्हेंटला दिला आहे.

184
Convent occupied Temple Land : कॉन्व्हेंट शाळेने कब्जा केलेली ११ एकर जमीन मंदिराला परत मिळणार; मदुराई खंडपिठाचा आदेश
Convent occupied Temple Land : कॉन्व्हेंट शाळेने कब्जा केलेली ११ एकर जमीन मंदिराला परत मिळणार; मदुराई खंडपिठाचा आदेश

मदुराई (तमिळनाडू) (Tamil Nadu) राज्यातील तिरुनेलवेली जिल्ह्यात असलेल्या अंबासमुद्रम् तालुक्यातील अरुलमिगु पापनाशस्वामी मंदिराची (Arulamigu Papanashaswamy Temple) जागा एका कॉन्व्हेंट शाळेने अनेक दशकांपासून भाडेतत्त्वावर घेतली होती. (Convent occupied Temple Land) पुढे त्यावर बेकायदेशीर इमारत बांधण्यात आली. ही इमारत पाडून मंदिराची भूमी मंदिराच्या ताब्यात देण्याचा करण्याचा आयुक्तांनी आदेश दिला होता. या निकालावर मदुराई खंडपिठाने शिक्कामोर्तब केले.

(हेही वाचा – Central Railway : रेल्वे अपघाती मृत्यूंमध्ये घट; मुंबईकरांचा लोकल प्रवास होतोय सुरक्षित)

या आदेशाकडेही कॉन्व्हेंटच्या व्यवस्थापनाने कानाडोळा केला. त्यामुळे शाळेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आयुक्तांच्या निर्णयाला आव्हान दिले. तमिळनाडू उच्च न्यायालयाच्या (Madras High Court) मदुराई खंडपिठाने या संदर्भात नुकताच निकाल देऊन आयुक्तांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. या जागेवरील शाळेची इमारत पाडून जागा मंदिराला द्यावी, असा आदेशही अमाली कॉन्व्हेंटला (Amala Convent Madurai) दिला आहे.

न्यायालयाचे कॉन्व्हेंट व्यवस्थापनावर ओढले ताशेरे

याचिकाकर्ते असलेले ‘अमाली कॉन्व्हेंट’चे व्यवस्थापन ‘विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होईल’, अशा प्रकारे थातूरमातूर कारण पुढे करून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. असे असते, तर वर्ष २०१३ मध्ये जेव्हा आयुक्तांनी इमारत पाडण्याचा आदेश दिला होता, त्यानंतर गेल्या १० वर्षांत शाळेने असे का केले नाही ?

आम्ही ३१ मार्च २०२४ पर्यंतची म्हणजे शैक्षणिक सत्र संपण्याची समयमर्यादा शाळेला देत आहोत. त्यानंतर त्यांनी शाळेची व्यवस्था इतरत्र करावी.

(हेही वाचा – Rafael Nadal is Back : स्पॅनिश ग्लॅडिएटर राफेल नदाल नवीन हंगामासाठी सज्ज)

काय आहे प्रकरण
  • न्यायालयीन दस्तावेजांनुसार याचिकाकर्ते अमाली कॉन्वेंटने अरुलमिगु पापनाशस्वामी मंदिरांतर्गत येणार्‍या ‘पिल्लयन अर्थसाम कट्टलाई’ मंदिराकडून ११-११ एकरचे चार भूभाग अशी ४४ एकर जागा भाडेतत्त्वावर घेतली होती. (Amala Convent Madurai)
  •  १९८५ यानंतर मंदिर आणि शाळा यांच्यात वाद झाल्याने मंदिराच्या अधिकार्‍यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या वेळी याचिका फेटाळण्यात आली. पुढे दोन पक्षांमध्ये संगनमत होऊन अमाली कॉन्व्हेंटने ३३ एकर भूमी परत करून ११ एकर जागा स्वत:कडे ठेवली. या भूमीचे दरवर्षी २ सहस्र रुपये भाडे देण्याचे ठरले, तसेच शाळा व्यवस्थापन या जागाचा केवळ शेतीसाठी उपयोग करेल, हेही निर्धारित करण्यात आले.
  • २०१२ मध्ये अमाली कॉन्व्हेंटने या भूमीवर शाळेची मोठी इमारत बांधली. मंदिराने या विरोधात शाळेकडे तक्रार केली, परंतु शाळेने याकडे कानाडोळा केला. त्यामुळे मंदिर समितीने या विरोधात तमिळनाडू (Tamil Nadu) हिंदु धार्मिक आणि धर्मादाय मंडळाच्या आयुक्तांकडे तक्रार करून ११ एकर जागा मंदिराकडे सुपुर्द करण्याची मागणी केली. शाळेने या विरोधात युक्तीवाद केले, परंतु न्यायालयाने त्यांना ग्राह्य धरले नाहीत. या वेळी शाळेने ती जागा विकत घेण्याची सिद्धताही दर्शवली. (Amala Convent Madurai)
  • डिसेंबर २०२३ मध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामध्ये म्हटले आहे की, ज्याअर्थी शाळा जागा विकत घेऊ शकते, त्याअर्थी तिच्याकडे अन्यत्रही जागा घेऊन तिथे शाळा उभारण्याची क्षमता आहे. या कारवाईचा ‘विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल’, या शाळेच्या युक्तीवादावर न्यायालयाने स्पष्ट सांगितले की, शाळा विद्यार्थ्यांच्या नावाखाली स्वत:च्या अयोग्य कृत्यांना झाकण्याचा प्रयत्न करत आहे. (Convent Occupied Temple Land)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.