ख्रिसमस उत्सवाच्या कार्यक्रमातून हिंदूंचे (Hindu) धर्मांतर करण्यात येत असल्याचा आरोप पंजाब येथे हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindutva organization) केला आहे. रोहतकच्या शिव पंजाबी धर्मशाळेत ख्रिसमस उत्सवाच्या कार्यक्रमात हा प्रकार होत असल्याचा हिंदू संघटनेच्या (Hindutva organization) कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या कार्यक्रमात कुस्तीपटू खली (The Great Khali) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
( हेही वाचा : करीना थापाला राष्ट्रपतींच्या हस्ते ‘PM National Child Award’ प्रदान)
विहिंपचा कार्यकर्त्यानी उधळला धर्मांतराचा डाव
मात्र हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांनी कार्यक्रम बंद पाडला. कारण या कार्यक्रमाचा उद्देश हिंदू (Hindu) धर्मातील लोकांना छुप्या पद्धतीने ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा होता. यावेळी कार्यक्रमस्थळी कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसेचे पठण केले आणि उपस्थितांना बाहेर जाण्यास भाग पाडले. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर आयोजकांनी कार्यक्रमस्थळ सोडून पळ काढला.
आर्थिक आमिष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न
याप्रकरणी विहिंपचे कार्यकर्ते म्हणाले की, शिव धर्मशाळेत ख्रिसमस साजरा केला जात नव्हता. तर आजारी लोकांना उपचाराचे आणि आर्थिक लाभाचे आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यास प्रवृत्त केले जात होते. मुळात प्रत्येक धर्मियांना त्यांच्या श्रद्धेनुसार सण साजरे करण्याचा अधिकार आहे. परंतु त्यासाठी सार्वजनिक जागा वापर केला जाऊ नये. धर्मिक कार्यक्रम करायचा असेल तर त्यांना चर्च आहेत, शिव धर्मशाळा ही जागा नाही, असे विहिंपचे कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे सांगितले. तसेच कार्यक्रमात उपस्थितींना तुम्ही आजारातून लगेच बरे व्हाल, अशा भूलथापा दिल्या जात होत्या, असा दावा सुषमा सनातनी यांनी केला. (Hindu)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community