‘ते’ दोन मौलवी अवैध मदरसेही चालवायचे! मुलांमध्ये हिंदुद्वेष पेरायचे! 

मौलवी महंमद उमर गौतम आणि मौलवी मुफ्ती काजी जहाँगीर आलम कासमी हे दोघे ३० हुन अधिक अवैध मदरसे चालवायचे, असा पोलिसांचा अंदाज आहे.

उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे मूक-बधिर मुले- मुली आणि अबला महिलांचे धर्मांतर करणारे मौलवी महंमद उमर गौतम आणि मौलवी मुफ्ती काजी जहाँगीर आलम कासमी या दोघांच्या चौकशीतून दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. या दोघांनी आतापर्यंत १ हजार हिंदूंचे धर्मांतर केल्याची माहिती आधीच उघड झाली. आता आणखी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. या दोघांनी खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे अनेक मदरसे सुरु केले आहेत. एकट्या गाझियाबाद येथे ८ बेकायादेशीर मदरसे सुरु करण्यात आले आहेत.

लवकरच गुन्हा दाखल होणार! 

अल्पसंख्यांक विभागाने आता या सर्व अवैध मदरशांवर कारवाई करण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे. हे मदरसे चालवणाऱ्यांना नोटीस पाठवण्याचे काम सुरु झाले आहे, त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या मदरशांकडे असलेल्या खोट्या प्रमाणपत्रांचीही चौकशी करण्यात येणार आहे. या मदरशांमध्ये मुस्लिम मुलांच्या मनात हिंदुद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता. तसेच व्हिडिओच्या माध्यमांतून त्यांच्या मनात हिंदू धर्माप्रती पराकोटीचा संताप निर्माण करण्यात यायचा.

३० हुन अधिक बेकायदेशीर मदरसे असण्याची शक्यता 

पोलिस मौलाना उमर गौतम याची अधिक चौकशी करत आहेत. धर्मांतरासाठी त्याने दिल्लीत दावा सेंटर सुरु केले होते. या सेंटरमध्येच धर्मांतर केले जायचे. मौलाना उमर हा गाझियाबाद येथे मोठ्या संख्येने अवैध मदरशे चालवत होता, अशी माहिती मिळाली आहे. अशा प्रकारे ३० हुन अधिक अवैध मदरसे चालवण्यात येत असल्याचा अंदाज पोलिसांना आहे. पोलिसांनी या मदरशांचे सर्व अवैध कागदपत्रे ताब्यात घेतले असून त्यांचा तपास सुरु केला आहे. ही कागदपत्रे कुठून बनवण्यात आली, याची अद्याप स्पष्ट माहिती मिळाली नाही, तसेच हे मदरसे कशासाठी वापरायचे याचीही माहिती पोलिस घेत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here