
बिहारमधील सारण जिल्ह्यातील छप्रा येथील रविलगंज भागात दि. ८ एप्रिलला काही संतप्त लोकांनी बांधकाम सुरु असलेले चर्च तोडले. हे चर्च टोला येथील वॉर्ड क्रमांक १० मध्ये स्कूलच्या नावाने बांधले जात होते. गावकऱ्यांचा आरोप आहे की, ख्रिस्ती मिशनऱ्या ग्रामस्थांना आमिष दाखवून ख्रिस्ती धर्म (Christianity) स्वीकरण्यासाठी दबाव निर्माण करत. याप्रकरणी पोलिसांनी बीएनएसएसचे कलम १६३ (पूर्वी सीआरपीसीचे कलम १४४) लागू केले आहे. तसेच मिशनरी संघटनेने ही तक्रार दाखल केली आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चर्च बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या तोडफोडीची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. सारणचे एसएसपी कुमार आशिष यांनी दि. ९ एप्रिलला पत्रकार परिषदेत सांगितले की, तोडफोडीदरम्यान चर्चमधून एक इलेक्ट्रिक मीटर (Electric meter) आणि दोन सेंटरिंग प्लँक्स (Centering planks) काढून टाकण्यात आले. मिशनरी संघटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे आणि एका ग्रामस्थालाही ताब्यात घेतले आहे.
(हेही वाचा – Unseasonal Rain : उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी पावसाने घेतला ७३ लोकांचा मृत्यू)
एसएसपी (SSP) म्हणाले की, दि. ८ एप्रिलला सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये परिसरात ख्रिश्चन धर्मांतराची चर्चा होती. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन प्रभारी आणि मंडळ अधिकाऱ्याने तपास सुरू केला. पोलिसांना अद्याप धर्मांतराचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत, परंतु प्रकरण गंभीर असल्याने, सदर-१ चे उपविभागीय पोलिस अधिकारी अधिक तपास करत आहेत.
ख्रिश्चन मिशनरी जबरदस्तीने करते धर्मांतर
गावकऱ्यांचा आरोप आहे की चर्चचे बांधकाम दोन वर्षांपासून सुरू होते. रामनाथ मांझी (Ramnath Manjhi) नावाच्या एका स्थानिक व्यक्तीने ३ एप्रिल २०२५ रोजी या विरोधात तक्रार दाखल केली होती. मांझी म्हणाले की, जहानाबाद येथील ज्योती प्रकाश (Jyoti Prakash) नावाची व्यक्ती जमीन खरेदी करून शाळा बांधण्याबद्दल बोलत होती. गावकऱ्यांनीही शाळा समजून बांधकामात मदत केली. पण नंतर तिथे चर्चचा बोर्ड पाहून सर्वांनाच धक्का बसला. मग मिशनऱ्यांनी गावकऱ्यांना ख्रिश्चन धर्म (Christianity) स्वीकारण्यास प्रवृत्त करायला सुरुवात केली. यामुळे लोक संतापले आणि ते चर्चविरुद्ध आक्रमक भूमिका घेतला.
(हेही वाचा – Oppo Find X8 Ultra : ५० मेगा पिक्सेलचे ३ कॅमेरे असलेला ओपोचा फोन जगभरात लाँच)
मिशनरी एक हजार रुपयांसोबत ‘पवित्र पाणी’ देत असतं
रामनाथ मांझी (Ramnath Manjhi) यांनी सांगितले की, मिशनऱ्यांचे लोक हळूहळू बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत येऊ लागले आणि दर रविवारी प्रार्थना करू लागले. प्रार्थनेत सहभागी झालेल्यांना एका लिफाफ्यात एक हजार रुपये देण्यात आले. लोकांना पैसे आणि रेशनचे आमिष दाखवून त्यांना अडकवले जात होते. मिशनऱ्यांनी सांगितले की जर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्यांच्या मुलींच्या लग्नाचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला जाईल. त्यांनी छठपूजेसारखे हिंदू सण साजरे करण्यापासून लोकांना रोखण्यास सुरुवात केली.
गावकरी म्हणतात की मिशनऱ्यांनी त्यांना खास पाण्याच्या बाटल्या दिल्या आणि २० दिवस ते पिण्यास सांगितले. तसेच ‘हालेलुया’ म्हणण्याचा सल्ला दिला. विद्यावती देवी नावाच्या एका स्थानिक महिलेने सांगितले की, “तो म्हणायचा की तुमच्या देवाची पूजा करणे थांबवा, येशूवर विश्वास ठेवा, मग तुमचे दुःख दूर होईल.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community