दौंडमध्ये १००-२०० हिंदू मुलींचे धर्मांतर; मुलांची खतना; लव्ह जिव्हाद करणाऱ्या मुस्लीम मुलांना 5 लाख रुपये

137

महाराष्ट्रातील दौंड येथे हिंदू मुलींचे मोठ्या संख्येने मुसलमान धर्मांतर करत असल्याचे उघड झाले आहे. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, दौंडमध्ये दरवर्षी सुमारे २०० मुलींने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे. यासाठी मुसलमान तरुणांना ५ लाख रुपये मिळतात, असा धर्मांतर झालेल्या हिंदू मुलींच्या कुटुंबांचा दावा आहे. तसेच असे धर्मांतर घडवून आणणाऱ्या धर्मांध मुसलमान तरुणांना राजकारण्यांचे पाठबळ मिळत असल्याचा गंभीर आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. 

हिंदू मुलांची जबरदस्तीने सुंता

या भागात केवळ हिंदू महिलाच नाही तर हिंदू पुरुषही इस्लामिक धर्मांतराचे बळी ठरत आहेत. हिंदू मुलांना हनी ट्रॅपमध्ये फसवले जाते आणि नंतर त्यांचे धर्मांतर करण्यास सांगितले जाते. लोकांचा दावा आहे की सुमारे १०० हिंदू मुलांची जबरदस्तीने  सुंता करण्यात आली आहे. टाईम्स नाऊशी बोलताना एका स्थानिकाने सांगितले की, एका वर्षात येथे सुमारे १०० ते २०० मुलींचे धर्मांतर करतात, त्यापैकी बहुतांश मुली आहेत. त्या मुली १७ किंवा १८ वर्षांच्या आहेत आणि त्याही बहुतेक कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आहेत. मुसलमान मुले हिंदू मुलींना लग्नाचे आमिष दाखवतात, लग्न केल्यावर मूल झाल्यावर घटस्फोट देतात आणि सोडून देतात. त्यानंतर पुन्हा दुसरे लग्न करण्यासाठी तयार होतात.

(हेही वाचा समान नागरी अधिकारात ‘हज’ कोट्याचा ‘कार्यक्रम’)

कोणतीही तक्रार करत नाही

अशा प्रकरणांबद्दल बोलण्यास हिंदू घाबरतात, कारण ते मुलींना मारहाण करतात, हे मुसलमान लोक रस्त्याने जाणाऱ्या तरुणींची खुलेआम छेड काढतात पण कोणी काहीच बोलत नाही आणि त्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार करत नाही. दौंडमध्ये सुरू असलेल्या धर्मांतराच्या कामामागे फारुख कुरेशी, कमाल कुरेशी, असिब कुरेशी, फरहान कुरेशी यांचा हात असल्याचे लोकांनी टाईम्स नाऊशी बोलताना सांगितले. त्याचे नाव घ्यायला कोणीही घाबरतो. यापैकी कुमेल कुरेशी उर्फ हाजीब साहेब याला अटक करण्यात आली आहे.  एका हिंदू तरुणाने ज्याची जबरदस्तीने खतना करण्यात आली, त्याने सांगितले की, मुसलमानांनी मला खाली पाडले आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. असिब शेखने माझा हात आणि कमल कुरेशीने माझा पाय धरला. यानंतर डॉक्टरांना खतना करण्यास सांगितले. नंतर त्यांनी मला रक्ताने माखलेल्या अवस्थेत सोडून दिले. 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.