महाराष्ट्र राज्यातील शिक्षा झालेल्या कैद्यांना शिक्षेत सूट मिळणार आहे. राज्य शासनाकडून (State Govt) राज्यमाफी देण्यात येणार असून यामध्ये जवळपास ८ हजार कैद्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे समजते. राज्यातील कारागृहात असलेल्या एक महिन्यापेक्षा जास्त ते जन्मठेप शिक्षा झालेल्या विशिष्ट प्रवर्गात मोडणाऱ्या कैद्यांना शिक्षेच्या प्रमाणात ५ दिवस ते १५ महिन्यांपर्यंत राज्यमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. (State Govt)
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन महाराष्ट्र राज्यात शिक्षा झालेल्या व कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंद्यांना आपल्या वर्तनात सुधारणा करून कारागृहातुन लवकरात लवकर मुक्त होण्याच्या दृष्टीने राज्यमाफी देणेबाबत अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांनी राज्य शासनाकडे (State Govt) प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर राज्य शासनाने (State Govt) गुरुवारी निर्णय जाहीर केला आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत वर्षानिमित्त शिक्षा बंद्यांना राज्यमाफी देणेबाबत घोषित करण्यात आले आहे. (State Govt)
(हेही वाचा – BMC : महानगरपालिकेने जाहीर केली दहा मालमत्ता थकबाकीदारांची यादी)
राज्यमाफीचा फायदा ८ हजार कैद्यांना
एक महिन्यापेक्षा जास्त ते जन्मठेप शिक्षा झालेल्या विशिष्ट प्रवर्गात मोडणाऱ्या बंद्यांना शिक्षेच्या प्रमाणात ५ दिवस ते १५ महिन्यापर्यंत राज्यमाफी जाहीर करण्यात आलेली आहे. अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्याकडुन सर्व कारागृह उपमहानिरीक्षक तसेच सर्व कारागृह अधीक्षक यांना तातडीने सदर शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. राज्य शासनाकडुन (State Govt) मिळालेल्या राज्यमाफीमुळे बंद्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षाधीन बंद्यांना त्यांच्या शिक्षेमध्ये सुट मिळाल्याने ते आपल्या कुटुंबात लवकरात लवकर जाऊन त्यांच्या जीवनाचा दुसरा प्रवास सुरू करतील आणि देशाचा नागरिक म्हणुन समाजाच्या मुख्य प्रवाहात समावेश होऊन शासनाचा “सुधारणा आणि पुर्नवसन” हा उद्देश साध्य होण्यास मदत होणार आहे असे कारागृह विभागाकडून काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. या राज्यमाफीचा फायदा राज्यातील ८ हजार कैद्यांना होणार असल्याचे म्हटले आहे. (State Govt)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community