Cooper Hospital : मेंदूत रक्तस्त्राव झालेल्या ५९ वर्षीय महिलेला महापालिकेच्या डॉक्टरांनी दिले जीवनदान 

1027
Cooper Hospital : मेंदूत रक्तस्त्राव झालेल्या ५९ वर्षीय महिलेला महापालिकेच्या डॉक्टरांनी दिले जीवनदान 
Cooper Hospital : मेंदूत रक्तस्त्राव झालेल्या ५९ वर्षीय महिलेला महापालिकेच्या डॉक्टरांनी दिले जीवनदान 
विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झालेल्या ५९ वर्षीय महिलेवर दुर्मिळ शस्त्रक्रिया महानगरपालिकेच्या डॉ. रु. न. कूपर रुग्णालयात (Cooper Hospital) पार पडली. रुग्णालयातील मेंदूविकार तज्ज्ञांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया त्या  महिलेला जीवनदान दिले आहे. भारतातील आतापर्यंतची ११ वी तर, मुंबई महानगरात मेंदू विकार तज्ज्ञांनी केलेली ही पहिलीच दुर्मिळ शस्‍त्रक्रिया आहे.

डोकेदुखी व उलट्यांमुळे त्रस्त झालेली ५९ वर्षीय महिला  ही महापालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कूपर रुग्णालयात (Cooper Hospital) दाखल झाली. वैद्यकीय तपासणीत या महिलेच्या मेंदूतील रक्तधमनीचा फुगा फुटल्याने मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न झाले. दाट मऊ ऊतकांच्या वातावरणात रक्तवाहिन्या स्पष्टपणे दृश्यमान करण्यासाठी डिजिटल सब्स्ट्रक्शन अँजिओग्राफी (DSA) या फ्लूरोस्कोपी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. त्यात या महिलेच्‍या मेंदूतील रक्त धमनीचा फुगा फुटल्याने मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न झाले. अन्‍युर‍िझम हा एक धमनीचा विकार आहे. ज्‍यामध्‍ये धमनीचे आवरण किंवा भिंत कमकुवत होते आण‍ि धमनी फुटून रक्‍तस्‍त्राव होऊ शकतो. (Cooper Hospital)

(हेही वाचा – Baramati Traffic Police: वाहनांच्या काचांना काळी फिल्म लावणारे रडारवर, बारामतीत १२५ जणांवर कारवाई)

संपूर्ण निदानानंतर या रुग्ण महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय मेंदू विकार (न्‍युरोलॉजी) तज्ज्ञांनी घेतला. ‘ट्रेंझा एम्बोलिझेशन’ या उपकरणाच्या सहाय्याने आधुन‍िक पद्धतीने शस्‍त्रक्रिया करण्यात आली. अशा प्रकारच्या शस्‍त्रक्रियेनंतर रूग्‍ण महिलेच्या रक्‍तामध्‍ये गुठळी होऊ नये म्हणून अस्पिरीन किंवा तत्‍सम औषधे देण्‍याची गरज लागत नाही. इतर पद्धतीने शस्‍त्रक्रिया केल्‍यास रूग्‍णांना अस्पिरिन किंवा तत्‍सम औषधे द्यावी लागतात. त्‍यामुळे पुन्‍हा रक्‍तस्‍त्राव होण्‍याची शक्यता असते. दुर्मिळ आणि अत्याधुनिक पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे या महिलेला जीवदान मिळाले आहे. (Cooper Hospital)

डॉ. रु. न. कूपर रूग्‍णालयाचे (Cooper Hospital)  अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी स्वतः तत्काळ प्रयत्न करून या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रणा आणि औषधे उपलब्ध करून दिली. डॉ. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली चेतासंस्थेच्या रोगांवर उपचार करणारे तज्ज्ञ (न्यूरोलॉजिस्‍ट) डॉ. प्रद्युम्न ओक, डॉ. मन‍ीष साळुंखे, डॉ. अबू ताह‍िर यांनी ही शस्‍त्रक्रिया यशस्‍वीपणे पार पाडली. भूलतज्ञ विभागप्रमुख डॉ. अन‍िता शेट्टी, औषधवैद्यक शास्‍त्र विभाग प्रमुख डॉ. नीलम रेडकर, सहाय्यक प्राध्‍यापक डॉ. दीप रावळ यांचे सहकार्य लाभले.

(हेही वाचा – Kho Kho Nationals : राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून निवडणार राष्ट्रीय स्पर्धेसाठी खो-खो संघ)

या शस्त्रक्रियेविषयी माहिती देताना अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते म्हणाले की, ‘ट्रेंझा एम्बोलिझेशन’ या उपकरणाच्या सहाय्याने भारतात झालेली ही ११ वी शस्‍त्रक्रिया आहे. तर, मुंबईत मेंदू विकार तज्ज्ञांनी केलेली अशा प्रकारची ही पहिलीच शस्‍त्रक्रिया आहे. यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट द्वारे अशा प्रकारे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता डॉ. कूपर रुग्णालयातील मज्जा संस्था आणि मेंदू विकार तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करत महानगरपालिकेच्या नावलौकिकात भर टाकली आहे. महानगरपालिकेच्‍या रूग्‍णालयात आधुनिक व गुंतागंतीच्‍या शस्त्रक्रिया अत्यंत माफक दरात होतात. सामान्‍य मुंबईकरांना त्याचा नेहमीच फायदा होतो, असे डॉ. मोहिते यांनी नमूद केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.