आंतरधर्मीय विवाहांसाठी आता समन्वय समिती; श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर सरकारचे पाऊल

159

श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर राज्य सरकारने सावध पावले उचलली आहेत. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी सरकारकडून समन्वय समिती नेमण्यात आली आहे. महिला व बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली ही समिती आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह करणा-या मुलींची तसेच, त्यांच्या कुटुंबीयांची माहिती घेऊन यांच्यात समन्वय घडवून आणणार आहे. त्याचप्रमाणे आईवडील किंवा मुली समन्वयासाठी तयार नसतील तर त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे.

महिला व बालविकासमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 13 सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये महिला व बालविकास विभाग प्रधान सचिव, आयुक्त, सहसचिव, नांदेडचे अॅड. योगेश देशपांडे, औरंगाबादचे संजीव जैन, नाशिकच्या सुजाता जोशी, मुंबईतून अॅड. प्रकाश साळसिंगिकर, नागपूरमधून यदू गौडिया, अकोल्यातून मीरातून कडबे, पुण्यातून शुभदा कामत, मुंबईतून योगित साळवी, उपायुक्त महिला व बालविकास आयुक्तालय यांचा समावेश करण्यात आला आहे.

ही समिती काय करणार ?

ही समिती नोंदणीकृत विवाह, अनोंदणीकृत विवाह, आंतरधर्मीय विवाह, पळून केलेले आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह यांची इंत्यभूत माहिती ठेवणार आहे. अशा महिला तसेच मुलींच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत किंवा नाही याचीही माहिती घेतली जाणार आहे. अशा मुलींच्या पालकांचा शोध घेऊन त्या पालकांचे समुपदेशन केले जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.