छत्रपती शिवाजी महाराज मैदानात (शिवाजी पार्क) मागील बुधवारी साचलेल्या पाण्यामुळे आता स्थानिक रहिवाशी, या प्रकल्पाचे तज्ञ सल्लागार, रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणेशी संबंधित तज्ञ सल्लागार तसेच महानगरपालिकेचे उद्यान विभागाचे अधिकारी व तज्ञ सल्लागार यांची प्रकल्पाच्या तांत्रिक पडताळनी बाबत कोअर कमिटी स्थापन करण्याचा निर्णय जी उत्तर विभागाने घेतला आहे.
( हेही वाचा : महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेऊ नये; चंद्रकांत पाटील)
छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये होणा-या धुळीच्या समस्येच्या उपाययोजनेकरिता महानगरपालिकेमार्फत केलेल्या कामाच्या आढावा बाबत मंगळवारी १९ जुलै २०२२ रोजी जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या दालनात शिवाजी पार्कचे स्थानिक रहिवाशी व जी उत्तर विभागाच्या अधिक यांसमवेत बैठक पार पडली.
या बैठकीदरम्यान जी-उत्तर विभागातील अधिका-यांनी, रेन वॉटर हार्वेस्टींग
यंत्रणा, मैदान समतल करण्याचे व गवत लावण्याचे काम हे स्थानिक रहिवाशांच्या सोबत वेळोवेळी झालेल्या बैठकीन्वये व तज्ञ सल्लागारांच्या सल्ल्याने करण्यात आलेले आहे. स्थानिक रहिवाशांनी मैदान समतल करण्याकरीता वापरण्यात आलेल्या माती भरावामुळे भविष्यात धुळीची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भभवण्याची शक्यता वर्तविली. तसेच धुळ उडण्यास प्रतिबंध करण्यासाठी लागवड करण्यात आलेल्या गवताबाबतही विरोध दर्शविला आहे व नव्याने तयार करण्यात आलेल्या रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणेच्या उपयोगितेबाबत साशंकता व्यक्त केलेली आहे.
या चर्चेदरम्यान सहाय्यक आयुक्त जी- उतर विभागाने शिवाजी पार्कचे स्थानिक रहिवाशी, प्रकल्पाचे तज्ञ सल्लागार, रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणेशी संबंधित तज्ञ सल्लागार तसेच महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी व तज्ञ सल्लागार यांची प्रकल्पाच्या तांत्रिक पडताळनी बाबत कोअर कमिटी स्थापन करून या विषयावर चर्चा करण्याचे सुचविले आहे. कोअर कमिटीच्या सल्ल्याने तांत्रिक बाबींची पडताळनी करून या प्रकल्पामध्ये काही प्रकारच्या उपाययोजना करण्याची गरज भासल्यास तज्ञ सल्लागारांनी सुचविलेल्या योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील,असे जी उत्तर विभागाच्या देखभाल व दुरुस्ती विभागाचे सहायक अभियंता अमोल गावित यांनी स्पष्ट केले.