होम क्वारंटाईन १७ दिवसांचे!

रुग्ण निर्देशित केल्यापासून दहा दिवस गृह विलगीकरणात राहिल्यानंतर त्यांना महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) पथकाच्या सल्ल्यानेच डिस्चार्ज मिळाल्याचे मानण्यात येईल.

113

कोविडबाधित रुग्णांसाठी गृह विलगीकरण अर्थात होम क्वारंटाईन संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने सुधारीत सविस्तर मार्गदर्शक सूचना नुकत्याच प्रसारीत केल्या असून त्यानुसार लक्षणे नसलेले बाधित किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण यांना एकूण सतरा दिवसांचा गृह विलगीकरण कालावधी पाळणे आवश्यक असल्याचे महापालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी स्पष्ट केले. होम क्वारंटाईनचा कालावधी कपात केला असून त्यात वाढ केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पूर्वी होम क्वारंटाईनचा कालावधी १४ दिवसांचा होता.

दहा दिवस पूर्ण झाल्यावर प्रकृतीबाबत माहिती देणे आवश्यक

लक्षणे नसलेले बाधित किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच क्वारंटाईन राहून आणि सोबत योग्य औषधोपचार घेवून लवकर बरे होवू शकतात. असे रुग्ण निर्देशित केल्यापासून दहा दिवस गृह विलगीकरणात राहिल्यानंतर त्यांना महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) पथकाच्या सल्ल्यानेच डिस्चार्ज मिळाल्याचे मानण्यात येईल. त्यासाठी संबंधित रुग्णाने त्यांच्या विभागाच्या वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) पथकाकडे दहा दिवस पूर्ण झाल्यावर प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती देणे आवश्यक राहील. त्यानंतर त्याने इतर सर्व रुग्णांप्रमाणेच पुढील सात दिवस गृह विलगीकरण पाळणे आवश्यकच आहे. म्हणजेच दहा अधिक सात असे एकूण सतरा दिवस गृह विलगीकरण कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यात कोणतीही सूट दिलेली नसल्याचे डॉ. मंगला गोमारे यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा : कोरोनापासून वाचायचे! मग अशी घ्या काळजी! )

विलगीकरण कालावधी योग्यरीत्या पाळून सहकार्य करावे!

काही प्रसारमाध्यमांमध्ये, मुंबईत लक्षणे नसलेले बाधित किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचा गृह विलगीकरण कालावधी पूर्वीच्या १४ दिवसांऐवजी आता १० दिवस करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. याबाबत बोलतांना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. हे सांगताना त्यांनी एकूण सतरा दिवस विलगीकरण पाळणे आवश्यक आहे. तसेच विलगीकरण कालावधी योग्यरीत्या पाळून सहकार्य करावे, असे आवाहनही गोमारे यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.