मुंबईत कोरोनाचा विस्फोट, दिवसभरात २,३७७ रुग्ण

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण संख्या २ हजारच्या आसपास होती. त्यातुलनेत 17 मार्च, बुधवारची रुग्ण संख्या पाहता सप्टेंबर महिन्यानंतर प्रथमच रुग्ण वाढीने उसळी मारली आहे, असे दिसून येते.  

मुंबईत मागील १५ दिवसांपासून रुग्ण वाढीचा  आलेख वाढतच जात असून बुधवारी, १७ मार्च रोजी दिवसभरात २ हजार ३७७ रुग्ण आढळून आले आहेत. सप्टेंबर महिन्यांनंतर प्रथमच इतकी रुग्ण संख्या वाढली आहे. यामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ही १६ हजार ७६१ एवढी आहे.

सप्टेंबर महिन्यानंतर प्रथमच इतकी रुग्ण वाढ!

बुधवारी दिवसभरात २,३७७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. केंद्र सरकारने कोरोनाची दुसरी लाट आल्याची माहिती दिल्यानंतर आता कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येऊ लागली. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण संख्या २ हजारच्या आसपास होती. त्यामुळे सप्टेंबरनंतर प्रथमच रुग्ण वाढीने उसळी मारली आहे.

(हेही वाचा : थकीत मालमत्ता करावर दोन टक्के दंड, तुघलकी निर्णयाविरोधात नगरसेवक आक्रमक)

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी कमी झाला!

दिवसभरात २,३७७ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्ण संख्या ३ लाख ४९ हजार ९५८ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ८ रुग्णांचा मृत्यू  झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ११ हजार ५४७ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ८७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून एकूण कोविड वाढीचा दर ४७ टक्के एवढा आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा दर १४५ दिवस एवढा आहे.

पुण्यातही कोरोना वाढतोय 

पुणे जिल्ह्यात बुधवारी, ४,७४५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १५ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आजमितीस २४ हजार १२७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ९ हजार ३४८ रुग्णनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात तात्पर्यंत ४ लाख ४३ हजार ८२२ रुग्ण संख्या झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here