Corona : अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर मुंबईत कोरोना रुग्णाचा मृत्यू

156
Corona : अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर मुंबईत कोरोना रुग्णाचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून देशात साथीचा आजार झपाट्याने वाढतांना दिसत आहे. अशातच आता पुन्हा एकदा (Corona) कोरोनाच्या विषाणूंनी आपलं डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. अनेक महिन्यांच्या विश्रांतीनंतर मुंबईमध्ये एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णाचा मृत्यू जुलै महिन्यातच झाला होता मात्र आता या मृत्यूची (Corona) अधिकृत नोंद करण्यात आली आहे. ही माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. या रुग्णाला ओमायक्रॉनच्या (Omicron) सब व्हेरियंटची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

(हेही वाचा – Wrestlers Protest : बजरंग पुनिया, विनेश आणि साक्षी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात)

मृत व्यक्ती ही ७५ वर्षीय मुंबईतील रहिवासी असून त्याला यकृताचा कर्करोग झाला होता. त्या व्यक्तीला (Corona) कोरोनाची लागण झाली असली तरी हा व्हायरल त्याच्या प्राथमिक मृत्यूसाठी जबाबदार नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आहे.

अशातच मुंबईत १० नवीन कोरोना (Corona) रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण संसर्ग संख्या ११,६४,१०८ इतकी झाली असून, आतापर्यंत १९,७७६ जणांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होतांना दिसत आहे.

तसेच रुग्ण बरे होण्याचा दर देखील चढता आहे. काल म्हणजेच १० ऑगस्ट रोजी चार रुग्ण (Corona) कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या आता ११,४४,२८५ इतकी झाली आहे. सध्या मुंबईत ४७ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत एकूण २९२ चाचण्या घेण्यात आल्या, त्यामुळे एकूण चाचणी संख्या १,८९,१७,९५१ झाली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.