भायखळा तुरुंगात कोरोना स्फोट! १० दिवसांत धक्कादायकरीत्या वाढली रुग्णसंख्या!

कोरोनाबाधित रुग्णांना जवळच्या एका शाळेतील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या घटत चालली आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून राज्य संपूर्ण अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यातच या निर्णयाला धक्का बसेल अशी घटना समोर आली आहे. मुंबईतील भायखळा कारागृहात १० दिवसांत तब्बल ६ मुलांसह ३९ महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

गर्भवती महिला कैदीचाही समावेश

कोरोनाबाधित रुग्णांना जवळच्या एका शाळेतील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर त्यातल्या वरिष्ठ नागरिकांना रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व कैद्यांना क्वॉरटाईन करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ज्या कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये एक महिला कैदी गर्भवती असून तिला जी.टी.रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा : महाराष्ट्रातील विरोधकांची हास्यजत्रा! संजय राऊतांचा टोला)

गेल्या आठवड्यात केलेल्या कोरोना चाचणी

पुन्हा एकदा कारागृहात कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ माजली आहे. एकाच वेळी ३९ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्यात तुरुंगात कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचे रिपोर्ट आल्यानंतर कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ज्या कैद्याचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यानंतर तात्काळ लागण झालेल्या कैद्यांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य कैद्यांना देखील उपचारासाठी पाठवले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here