सध्या देशात कोरोना रुग्णांची (Corona JN.1 update) संख्या झपाट्याने वाढत आहे. नव्याने आलेला कोरोनाचा सबव्हेरियंट JN.1 ने चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. या व्हेरियंटचा झपाट्याने फैलाव होत आहे.
(हेही वाचा – Drumsticks Leaf Benefits : शेवग्याच्या पानांचे आरोग्यासाठी ५ आश्चर्यकारक फायदे)
आरोग्य उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार ८ जानेवारी रोजी राज्यात कोरोनाच्या (Corona JN.1 update) ६१ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७० रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी परतली आहेत. राज्यात एकाही करोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद मागील २४ तासांत झालेली नाही. तसेच राज्यात कोरोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ ची रुग्णसंख्या २५० वर पोहोचली असून, त्यातील तब्बल १५० रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात मागील २४ तासांत जेएन.१ च्या ५९ रुग्णांची नोंद झाली आहे. (Corona JN.1 update)
(हेही वाचा – Sesame Seeds : महिलांनो आरोग्य राखण्यासाठी हिवाळ्यात खा ‘हा’ पदार्थ)
JN.1 ने देशभरात चिंता वाढली
कोरोना च्या JN.1 (Corona JN.1 update) या प्रकारामुळे पुन्हा एकदा देशभरात चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ठाण्यामध्ये JN.1चे ७ रुग्ण तर बीड मध्ये ३ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच नागपूर ३०, मुंबई २२, सोलापूर ९, सांगली ७, जळगाव ४, अहमदनगर ३, छत्रपती संभाजीनगर २, कोल्हापूर २, नांदेड २, नाशिक २, धाराशिव २, अकोला १, रत्नागिरी १, सातारा १, सिंधुदुर्ग १ आणि यवतमाळ १ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यातील जेएन.१च्या एकूण रुग्णांपैकी ६० टक्के पुण्यात आहेत. (Corona JN.1 update)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community