Corona JN.1 update : राज्यात JN.1 व्हेरियंटचे २०० पेक्षा अधिक रुग्ण

कोरोना च्या JN.1 या प्रकारामुळे पुन्हा एकदा देशभरात चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ठाण्यामध्ये JN.1चे ७ रुग्ण तर बीड मध्ये ३ रुग्ण आढळून आले आहेत.

193
Corona JN.1 update : राज्यात JN.1 व्हेरियंटचे २०० पेक्षा अधिक रुग्ण

सध्या देशात कोरोना रुग्णांची (Corona JN.1 update) संख्या झपाट्याने वाढत आहे. नव्याने आलेला कोरोनाचा सबव्हेरियंट JN.1 ने चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. या व्हेरियंटचा झपाट्याने फैलाव होत आहे.

(हेही वाचा –  Clean Survey 2023: महाराष्ट्र देशातील सर्वात स्वच्छ राज्य, नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर)

आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासात कोरोनाचे (Corona JN.1 update) ६०५ रुग्ण आढळून आले आहेत. तर बुधवारी (१० जानेवारी) २ रूग्णांचा केरळमध्ये आणि २ रूग्णांचा कर्नाटकमध्ये मृत्यू झाल्याची नोंद आहे. दरम्यान देशातील एक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६४३ इतकी झाली आहे. तर कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४,५०,१९,८१९ वर पोहोचली आहे. यावेळी एकूण मृतांची संख्या ५,३३,४०६ वर पोहोचली आहे.

(हेही वाचा – Waste Water Treatment Plant : प्रक्रिया केलेले सांडपाणी पिण्यायोग्य; यासाठी असा बनवला जात आहे आराखडा)

आरोग्य उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात जेएन.१ प्रकरणांची संख्या २०० च्या पुढे गेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ जानेवारीपर्यंत देशभरातील १२ राज्यांमधून JN.1 (Corona JN.1 update) चे एकूण ६८२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

(हेही वाचा –  PM Narendra Modi यांचा नाशिक दौरा; वाहतुकीत होणार ‘हे’ बदल)

JN.1 ने देशभरात चिंता वाढली

कोरोनाच्या JN.1 (Corona JN.1 update) या प्रकारामुळे पुन्हा एकदा देशभरात चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ठाण्यामध्ये JN.1चे ७ रुग्ण तर बीड मध्ये ३ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच नागपूर ३०, मुंबई २२, सोलापूर ९, सांगली ७, जळगाव ४, अहमदनगर ३, छत्रपती संभाजीनगर २, कोल्हापूर २, नांदेड २, नाशिक २, धाराशिव २, अकोला १, रत्नागिरी १, सातारा १, सिंधुदुर्ग १ आणि यवतमाळ १ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यातील जेएन.१च्या एकूण रुग्णांपैकी ६० टक्के पुण्यात आहेत. (Corona JN.1 update)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.