Corona JN.1 update : देशातील रूग्णांची संख्या हजारापार; कर्नाटकात सर्वाधिक रुग्ण

तेलंगणा आणि राजस्थानमध्ये JN.1 सब व्हेरिएंटच्या रूग्णांची ३२ प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. छत्तीसगडमधील JN.1 ची २५, दिल्लीतील १६, उत्तर प्रदेशातील सात, हरियाणामधील पाच, ओडिशातील तीन, पश्चिम बंगालमधील दोन आणि उत्तराखंडमधील एकाला JN.1 ची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

178
STSS: कोरोनानंतर आता 'या' धोकादायक आजाराची भीती, तज्ज्ञांनी कोणती लक्षणे सांगितली ? जाणून घ्या

कोरोना च्या JN.1 (Corona JN.1 update) या प्रकारामुळे पुन्हा एकदा देशभरात चिंता वाढली आहे. अशातच ‘Indian SARS-CoV-2 Genomics Consortium’ (INSACOG) ने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक या राज्यात जेएन १ च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. अशातच मागील २४ तासांमध्ये कर्नाटकात २१४ प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. (Corona JN.1 update)

इतर राज्यांमधील जेएन १ चे रुग्ण –

कर्नाटकाच्या खालोखाल महाराष्ट्रात १७०, केरळमध्ये १५४, आंध्र प्रदेशात १८९, गुजरातमध्ये ७६, गुजरातमध्ये ८८ अशा रुग्णांची नोंद झाली आहे. तर तामिळनाडू आणि गोव्यात ९० आढळून आले आहेत. (Corona JN.1 update)

(हेही वाचा – Ind vs Eng Test Series : मोहम्मद शामी, ईशान किशन यांचा विचार नाही, ध्रुव जेरेल एकमेव नवीन चेहरा)

याशिवाय तेलंगणा आणि राजस्थानमध्ये JN.1 सब व्हेरिएंटच्या रूग्णांची ३२ प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. छत्तीसगडमधील JN.1 ची २५, दिल्लीतील १६, उत्तर प्रदेशातील सात, हरियाणामधील पाच, ओडिशातील तीन, पश्चिम बंगालमधील दोन आणि उत्तराखंडमधील एकाला JN.1 ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. (Corona JN.1 update)

नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे – मुख्यमंत्री

देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन (Corona JN.1 update) हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Corona JN.1 update)

(हेही वाचा – Atal Setu आजपासून खुला, आता २ तासांच्या प्रवासाला लागणार फक्त २० मिनिटं)

३३ हजार ऑक्सिजन बेड्स –

सध्या राज्यात ६३ हजार विलगीकरण बेड्स, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स, (Corona JN.1 update) ९ हजार ५०० आयसीयू बेड्स व सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी जेएन वन या नव्या व्हेरिएंटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, असे सांगितले. (Corona JN.1 update)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.