कोरोनाच्या नव्या JN.1 व्हेरियंटचे (Corona New Variant) संशयित रुग्ण सध्या वाढत आहेत. मुंबईत आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये साध्या तापाची लक्षणे दिसू लागली आहेत. सर्दी, ताप आणि अंगदुखीच्या तक्रारी अशा रुग्णांमध्ये आढळत आहे. त्यामुळे लक्षणे पाहून चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे. कोरोनाचा नवा ‘जेएन.१ ‘ व्हेरियंट सापडल्यामुळे सरकार आणि प्रशासन सतर्क झाल आहे.
सध्या घाबरण्याची स्थिती नसली, तरी नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. येत्या काही आठवड्यात या प्रकरणांमध्ये किंचीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
(हेही वाचा – Mumbai Airport : फ्रान्समध्ये अडकून पडलेल्या २७६ भारतीयांची सुटका, ४ दिवसांनंतर विमान मुंबईत परतले)
‘ही’ लक्षणे जाणवतात –
– रुग्ण ३ ते ५ दिवसांत बरे होतात, मात्र अशक्तपणा दूर होण्यात १५ दिवसांचा कालावधी लागतो, अशी माहिती औषध विशेषज्ञ डॉ. प्रतित समदानी यांनी दिली आहे, तर आमच्याकडे उपचारासाठी आलेल्या एकाही रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही, अशी माहिती वोक्हार्ड रुग्णालयाचे डॉ. बेहराम पार्डीवाला यांनी दिली तसेच अलीकडेच आलेला १ रुग्ण एका दिवसात बरा झाल्याचे हिंदुजा रुग्णालयाचे सीईओ डॉ. जॉय चक्रवर्ती यांनी सांगितले.
मुंबईत ९ रुग्ण दाखल
राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १६८ वर पोहोचली असून त्यांपैकी ७६ मुंबईतील आहेत. सध्या राज्यात एकूण ११ रुग्ण रुग्णालयात दाखल असून त्यापैकी नऊ मुंबईतील आहेत. मुंबईतील ५५ टक्के रुग्णांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
काळजी कशी घ्याल?
– बूस्टर डोस घ्यायचा राहिल्यास तातडीने घ्यावा.
– मॉल, थिएटर, पार्क किंवा कार्यालयात मास्क वापरणे आवश्यक आहे. लक्षणे आढळल्यास तपासणी करा.
– सर्दी, खोकला, ताप, असल्यास मास्क वापरा.
– पॉझिटिव्ह केसेसबद्दलची माहिती पालिकेला देण्याची सूचना रुग्णालयांना देण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.