श्वसन विकार आणि कोरोनाच्या नवीन व्हेरियंटबाबत (Corona New Variants) जागतिक आरोग्य संघटनेने अलर्ट जारी केला आहे. कोरोना विषाणूचे स्वरुप बदलत असून सर्वच देशांनी याविषयी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ वरील तांत्रिक विभागाच्या मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सोशल मिडियावर यासंदर्भात एक व्हिडियोशेअर केला आहे. या व्हिडियोमध्ये श्वसनाचे विकार पसरण्याची कारणे सांगितली आहेत आणि त्यापासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, याची माहिती दिली आहे.
(हेही पहा –Ahmednagar-Kalyan Highway Accident : अहमदनगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू )
SARS coV-2 स्वत:ला बदल आहे…
जगभरात श्वसनासंबंधी विकार वाढत आहेत. यासंदर्भात मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी ‘X’द्वारे म्हटले आहे की, कोरोना, फ्लू, राइनो व्हायरस, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि इतर रोगांचा समावेश आहे. SARS coV-2 सतत स्वत:ला बदल आहे. कोरोनाचे सबव्हेरिएंट JN.1 देखील पसरत आहे.
Respiratory diseases are increasing around the world due to a number of pathogens incl #COVID19, #flu, rhinovirus, mycoplasma pneumonia & others
SARS-CoV-2 continues to evolve. JN.1 (subvariant of BA.2.86) is already a VOI and continues to increase in circulation ⬇️ https://t.co/739wgCFlBz
— Maria Van Kerkhove (@mvankerkhove) December 17, 2023
Join Our WhatsApp Community