नाशिक आणि अहमदरनगरमध्ये कोरोना रुग्णाचा मृत्यू

118

नाशिक आणि अहमदनगरमध्ये सोमवारी प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन रुग्णांच्या मृत्यूसह राज्यातील मृत्यूदर १.८४ टक्क्यांवर नोंदवला गेल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, मोठ्या संख्येने रुग्णांना डिस्चार्ज मिळत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या १८ हजारांच्या आसपास कायम आहे.

( हेही वाचा : मुंबईत सव्वा महिन्यात पावसाने घेतला ३३ जणांचा बळी )

आरोग्य विभागाची माहिती 

राज्यात १८ हजार २७ कोरोना रुग्णांना सध्या उपचार दिले जात आहे. १ हजार १८९ नव्या रुग्णांच्या नोंदीसह गेल्या २४ तासांत १ हजार ५२९ रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७.९३ टक्क्यांवर नोंदवले गेल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तर मृत्यूदर १.८४ टक्क्यांवर कायम आहे. सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आढळली आहे. पुण्यात आता ६ हजार ५१४ रुग्णांना उपचार दिले जात आहेत. त्याखालोखाल मुंबईत ३ हजार ५५७, ठाण्यात २ हजार १३७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील इतर शहरांत नागपूरमध्ये ८०५, नाशकात ४२१, जालन्यात ३५४, औरंगाबादमध्ये ३६९ कोरोना रुग्णांना उपचार दिले जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.