शुक्रवारी राज्यातील विविध भागांतून २४ हजार ९४८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर डिस्चार्ज संख्येचा वेग अजूनच चांगला सुधारला. एकाच दिवसांत तब्बल ४५ हजार ६४८ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. मात्र वाढत्या मृत्यूंच्या संख्येत गंभीर आजार असलेल्या रुग्णांचा भरणा असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
सहव्याधीग्रस्त रुग्णांना धोका
शुक्रवारी १०३ रुग्णांचा मृत्यू झाला. यात मुख्यत्वे फुफ्फुसाशी निगडीत आजार, कर्करोग, मूत्रपिंडाचा आजार, अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब या आजारांच्या रुग्णांचा समावेश आहे. ओमायक्रॉन या विषाणूमुळे तिसरी लाट धोकादायक नसली, तरीही रुग्ण वेळेवर निदान करण्यासाठी येत नसल्याने अद्यापही मोठे आव्हान असल्याचे, राज्य टास्क फोर्सच्या सदस्यांनी सांगितले. या रुग्णांमधील कोरोनाचे वेळेवर निदान होताच, गंभीर आजारांवर नियंत्रण मिळवण्यात बराच वेळ जातो. राज्यात एकच लसीकरण पूर्ण केलेल्या रुग्णांचीही लक्षणीय नोंद असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
( हेही वाचा: थंडी, धुक्यामुळे रेल्वेच्या लांब पल्ल्याचा ‘या’ गाड्या रद्द )
राज्यात ओमायक्रॉनची संख्या तीन हजारपार
शुक्रवारी ओमायक्रॉनच्या नोंदीत ११० रुग्णांची भर पडली. पुण्यातच नवे ओमायक्रॉनचे ११० रुग्ण आढळून आले. त्यामुळे आतापर्यंत राज्यात ३ हजार ४० रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
Join Our WhatsApp Community