Corona Patient: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सात दिवसांत दुपटीने वाढली, काळजी घेण्याचे आवाहन

आयसीयूमध्ये २९ तर जनरल वॉर्डमध्ये ७  जणांवर उपचार सुरू आहेत.

142
Corona Patient: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सात दिवसांत दुपटीने वाढली, काळजी घेण्याचे आवाहन
Corona Patient: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सात दिवसांत दुपटीने वाढली, काळजी घेण्याचे आवाहन

देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईत सोमवारी ६ संशयित रुग्ण सापडले असून बुधवारी (३ जानेवारी) या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत सापडलेल्या संशयित रुग्णांची संख्या २६ इतकी झाली आहे. त्यामुळे मुंबईत संशयित रुग्णांची संख्या १३७ वर पोहोचली आहे.

राज्यात बुधवारी १०५ कोरोना रुग्ण सापडले तर सक्रिय रुग्णांची संख्या ७३१ वर पोहोचली आहे. यापैकी ६९५ जण होम क्वारंटाईन असून ३६ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी आयसीयूमध्ये २९ तर जनरल वॉर्डमध्ये ७  जणांवर उपचार सुरू आहेत.

(हेही वाचा – Rs 2000 Currency Notes : ९७.३८ टक्के २००० रुपयाच्या नोटा बँकांकडे परत आल्याची रिझर्व्ह बँकेची माहिती)

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सात दिवसांत दुपटीने वाढली असताना मुंबईतही बुधवारी कोरोना रुग्णांची मोठी वाढ पाहायला मिळाली. मुंबईत आज सापडलेल्या २६ कोरोना रुग्णांपैकी ३ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर १९ जण आज कोरोनामुक्त झाले असून ४४१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आज सापडलेल्या ५१ टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे आढळली असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.