राज्यात कोरोनाचा धोका वाढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोरोनाचा मृत्यूदर १.८२ टक्के आहे. पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा कोल्हापूर या सहा जिल्ह्यांत कोरोना वाढत असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले. म्हणून राज्यात १३ आणि १४ एप्रिल रोजी कोरोनासाठी मॉकड्रिल घेतले जाणार आहे. महाराष्ट्रात मास्कसक्ती केली नसून काळजी करण्याचे कारण नाही असे आवाहन सावंतांनी केले आहे.
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोविड सज्जतेसाठी १३ आणि १४ एप्रिल रोजी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रार्दूभावामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून आता सातारा जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना मास्क अनिवार्य करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरानाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नागरिकांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पण हा सौम्य प्रकारातील कोरोना असून त्यामुळे घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. तरीही सर्वांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर १३-१४ एप्रिल रोजी राज्यात मॉक ड्रील घेण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. केंद्र सरकारने सूचना दिल्यानुसार, आम्ही १३-१४ एप्रिल रोजी राज्यात आपल्या कोविड सज्जतेसाठी मॉक ड्रिल घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
(हेही वाचा – सांगलीतील कारागृहात कोरोनाचा शिरकाव; प्रशासन सतर्क )
Join Our WhatsApp Community