राज्यातील कोरोनास्थिती नियंत्रणात, बुधवारी १,१९३ नवे बाधित

139

दिवाळीच्या सण-उत्सवातदेखील कोरोनाचे रुग्ण आता पुन्हा हजारोच्या संख्येत दिसून येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता काहींनी वर्तवली होती. मात्र राज्यात कोरोना परिस्थितीत नियंत्रणात आल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी राज्यात कोरोनाचे १ हजार १९३ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूणसंख्या आता ६६,१४,१५८ वर पोहोचली आहे.

मुंबईतही ३१९ नव्या बाधितांची नोंद

बुधवारी राज्यातील विविध भागांतून १ हजार ५९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. कोरोनाच्या उपचारांतून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत ६४,५५,१०० पर्यंत पोहोचली आहे. तर बरे होण्याचे प्रमाण ९७.६ टक्के एवढे दिसून आले आहे. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, राज्यात आता १५,११९ रुग्ण कोव्हिडसाठी उपचार घेत आहेत. बुधवारी ३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के नोंदवला जात आहे. मुंबईतही ३१९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ५ कोरोनाबाधितांची आपला उपचारादरम्यान जीव गमावला आहे.

(हेही वाचा- मुंबईकरांनो, वाचा कोरोना लसीकरणासंदर्भात महत्वाची बातमी)

चार दिवस लसीकरण बंद

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर उद्या गुरुवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२१ ते रविवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२१ असे चार दिवस कोविड लसीकरण बंद राहणार आहे. महानगरपालिकेकडे कोविड लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सोमवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ पासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार आहे. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.