चीनचा कोरोना व्हेरिएंट महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात दाखल

170

२०२२च्या अखेरीस चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा हाहाकार मजला आहे. त्यामुळे भारत सरकारनेही राज्यांना अलर्ट होण्याचा इशारा दिला आहे. अशातच एक धक्कादायक वृत्त आले आहे. चीनमधील कोरोनाचा नव्या व्हेरियंटची लागण झालेला रुग्ण महाराष्ट्राच्या शेजारील गुजरातमधील बडोदा येथे सापडला आहे. ओमिक्रॉनच्या सब व्हेरिएंट BF7 ने चीनमध्ये हाहाकार माजला आहे.

गुजरातमध्ये BF7 चे दोन रूग्ण?

गुजरातमध्ये BF7 या व्हेरिएंटचे दोन रूग्ण आढळल्याची चर्चा आहे. अशात एका प्रकरणात संबंधित रुग्ण चीनच्या व्हेरियंटने बाधित असल्याचे समोर आले आहे. एक अनिवासी भारतीय महिला या व्हेरिएंटने संक्रमित झाली आहे. गुजरातमध्ये या व्हेरिएंटचा रूग्ण आढळण्याच्या आधी BF7 चे इतर रूग्णही आढळले आहेत. ऑक्टोबर महिन्यातही एक रूग्ण आढळला होता. मात्र चीनमध्ये या व्हेरिएंटने कहर माजवला असताना गुजरातमध्ये एक रूग्ण आढळल्याची बातमी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी बुधवारी, २१ डिसेंबर रोजी यासंदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीत देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत हा निर्णयही घेण्यात आला की, आरोग्य मंत्रालय दर आठवड्याला देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहे. देशात कोरोनाच्या चाचण्या योग्य प्रमाणात केल्या जात आहेत. लोकांनी मोठ्या प्रमाणावर बूस्टर डोस घ्यावा असे आवाहन या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केले आहे.

(हेही वाचा नागपूरात भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्चा; लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.