देशात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हेरिएंटचा पॉझिटिव्ह रेटही वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. केंद्र सरकारने राज्यांना कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार ९८१ आहे. तसेच देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. दरम्यान वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता १० आणि ११ एप्रिलला मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले आहे.
( हेही वाचा : भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन )
देशात १० आणि ११ एप्रिलला मॉक ड्रिल
कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने १० आणि ११ एप्रिलला सर्व राज्यांमध्ये कोरोनाच्या तयारीबाबत मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. या संदर्भात सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने राज्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या जगातील रोजची नवी रुग्णसंख्या पाहिल्यास भारत सातव्या क्रमांकावर आहे. यामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
तसेच मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये १२३ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ५०० हून अधिक झाली असून ४३ रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत यापैकी २१ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
Join Our WhatsApp Community